औरंगाबाद : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शनासाठी उद्धवसेना , शिंदेसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे . त्यात औरंगाबाद जिल्ह्यातून २० हजार लोक आणण्याचे उद्दिष्ट मातोश्रीवरून माजी खासदार चंद्रकांत खैरे , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आले आहे . एवढ्या लोकांना नेण्या - आणण्यासाठी किमान दोन कोटी रुपये आणि चार हजार चारचाकी लागणार आहेत . त्यासाठी धावपळ सुरू झाली आहे . शिंदे गटाने गर्दीसाठी मेळावे घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे . मात्र , किती लोक न्यायचे , याचे टार्गेट पुढील आठवड्यात निश्चित करण्याचे ठरवले आहे . उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की , एका चारचाकीत पाच जण गृहीत धरले तरी चार हजार गाड्या लागतील . प्रत्येक गाडीचा इंधन खर्च ५ हजार म्हणजे एकूणात २ कोटी रुपये लागतील . सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने चारचाकी जमवण्यासाठी सर्व शक्ती त्यासाठी पणाला लावण्यात आली आहे . दरम्यान , शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट , जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी गर्दीचा अंदाज घेण्यासाठी हिंदू गर्वगर्जना यात्रेच्या नावावर मेळावे सुरू केले आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Chandrayaan-3 : Pragyan Rover ने ISRO को दे दिया एक और बड़ा टेंशन? | Lunar Mission India | Top News
Chandrayaan-3 : Pragyan Rover ने ISRO को दे दिया एक और बड़ा टेंशन? | Lunar Mission India | Top News
আজাদী কা অমৃত মহোৎসৱ উপলক্ষে মাজুলীত মহিলা গোটৰ বাইক ৰেলি: হৰ ঘৰ ত্ৰিৰংগা কাৰ্যসূচীৰ সজাগতা
দেশে স্বাধীনতা লাভ কৰাৰ ৭৫ বছৰীয়া এই গৌৰৱৰ ক্ষণত কেন্দ্ৰীয় চৰকাৰে আজাদী কা অমৃত মহোৎসৱ...