फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथे पोषण अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले . या वेळी पोषण आहार अभियाना अंतर्गत , रांगोळी स्पर्धा , सदृढ बालक स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या . व किशोरवर्गीय मुलींना आहार आणि आरोग्या विषयी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले . पाथ्री ता फुलंब्री येथे पोषण आहार अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले . या कार्यक्रमाला सरपंच महेंद्र पाथ्रीकर ग्रामसेवक अशोक गवते मोरे मॅडम , शिंदे मॅडम , पर्यवेक्षिका आलमनुर पटेल , अनिता कोलते , आम्रपाली दांडगे , अनुराधा जाधव , अंगणवाडी सेविका व चंद्रकाला जाधव , ज्योती उबाळे , संगीता गवरे , मदतनीस वडोद बाजार बीटच्या सर्व सेविका व मदतनीस उपस्थित होत्या , तसेच बचत गटाच्या राधा जाधव , राधिका गवारे , यादेखील उपस्थित होत्या . यावेळी पर्यवेक्षिका यांनी किशोरवर्गीय मुलींना आहार व आरोग्य विषयी विविध विषयांवर मार्गदर्शन केले तसेच अंगणवाडी सेविका पाथ्री यांनी सर्वांचे आभार मानले