देशात तसेच राज्यात गुरे, जनावरांवर आलेल्या "लम्पी स्कीन" या आजाराचे गांभीर्य लक्षात घेत हलविरा ग्रामपंचायतच्या वतीने फेमा.पशु वैद्यकीय अधिकारी चारठाणा यांना हलविरा गाव येथे तात्काळ "लम्पी स्कीन" प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे या आशयाचे (सरपंच) सौ.विमल राठोड व (उप सरपंच) सौ.लंकावती गोरे यांच्या सहीचे निवेदन श्री.संतोष पवार व श्री. दिलीप राठोड यांच्या हस्ते देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदर निवेदनाची तसेच "लम्पी स्कीन" साथीच्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पशू वैद्यकीय अधिकारी श्री.एस.जी.चव्हाण, परिचारक श्री. सोनुने व त्यांच्या टीमने तात्काळ दखल घेत त्यांचे मार्गदर्शनाखाली सेवादाते डॉ.घाटुळ यांनी आज दि.26/09/2022 रोजी सरपंच, उप सरपंच यांचे उपस्थितीत हलविरा येथे सुमारे 120 जनावरांचे लसीकरण केले आहे. सदरवेळी ग्रा.पं.सदस्य श्री.संतोष पवार, दिलीप राठोड, हरिभाऊ पवार, तुकाराम राठोड, शेषराव पवार, विनायक काळे, माधव काळे, भगवान शेळके, माधव राठोड, अविनाश पवार, यादव राठोड, गोविंद पोले, गणेश राठोड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सदर लसीकरण शिबिरास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दर्शविला. पशू वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या टीमने निवेदनाला व विनंतीला मान देऊन तात्काळ जनावरांना लसीकरण केल्याबद्दल हलविरा ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर श्री.चव्हाण, परिचारक श्री.सोनुने, डॉ.घाटुळ व त्यांच्या टीमचे आभार मानले. यापुढे देखील हलविरा ग्रामस्थांना असेच सहकार्य कराल अशी भावनाही व्यक्त केली.