कन्नड तालुक्यातील २५३ वयोवृद्ध कलावंत मानधन योजनेच्या प्रतीक्षेत चार वर्षांत एकदाही निवड चाचणी झाली नाही , कलावंतांची होतेय उपासमार कीर्तन , भारूड , नाटक , जागर , गोंधळ , तमाशासह अनेक लोककला सादर करून समाजप्रबोधन , मनोरंजन करता करता आपले आयुष्य वेचणाऱ्या कलावंतांची उतरत्या वयात हेळसांड होऊ नये , यासाठी १ ९ ५६ मध्ये वयोवृद्ध लोककलावंत साहित्यिक व कलाकारांना मानधन देण्याची योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे . दरवर्षी एका जिल्ह्यातील ६० कलाकारांची मानधन योजनेसाठी निवड करण्यात येते . मात्र गेल्या साडेतीन , चार वर्षांपासून कलावंत निवड चाचणीच झाली नसल्यामुळे कन्नड तालुक्यातील २५३ वयोवृद्ध कलावंत योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत . २०१ ९ पासून आलेल्या २५३ वयोवृद्ध कलावंतांच्या फाइल्स कन्नड पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाठवल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले आहे . चाचणीची तारीख देणे हे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे काम आहे . मात्र , जिल्हा परिषदेच्या उदासीन कारभाराचा फटका वयोवृद्ध कलावंतांना फटका बसतो आहे . साडेतीन वर्षे झाले तरी चाचणीची तारीखच मिळत नसल्याने हजार दीड हजार रुपये खर्च करून तयार केलेल्या वयोवृद्ध कलावंत मानधनाच्या फाइल्स खर्च वाया जातो की काय अशीच शंका आता कलावंतांना येते . नियमानुसार योग्य कलावंतांची निवड करण्यासाठी शेषराव गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हा समिती कार्यरत होती . परंतु समितीचा कार्यकाल संपला आहे . तेव्हापासून समिती अद्याप झाली नसल्याने शेकडो वयोवृद्ध कलावंताच्या फाइल्स सध्यातरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात धूळ खात पडून आहे . वयोवृद्ध कलाकारांची हेळसांड थांबावा वयोवृद्ध कलावंतांच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी २०१४ पासून मी प्रयत्न करतो आहे . त्यावेळी देखील माझी फाइल ओके असूनही मला डावलण्यात आले . आता शासनाने या तोडगा काढावा , अशी प्रतिक्रिया कलावंत एकनाथ सांडू शिंदे यांनी दिली . प्रश्न मार्गी लावावा वयोवृद्ध कलावंतांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावावा , अशी प्रतिक्रिया लोककलावंत गोरखनाथ सुर्यभान निकम यांनी केली . पंचायत समितीने जि.प.कडे पाठवलेले प्रस्ताव २०१ ९ -२० : १३२ , सन २०२०-२१ : २३ , सन २०२१-२२ ९ ८ . एकुन : २५३ प्रस्ताव आहे . मानधन : अ श्रेणीतील कलावंत ३२५० रुपये , ब श्रेणीतील कलावंत २७०० रुपये , क श्रेणीतील कलावंत २२५० रुपये मानधन आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना मिळणार पुरस्कार
२ सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज मागविले
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य...
PM Modi has recognised 10 more wetlands designated as Ramsar site as a bold initiative for environmental protection.
On the 4th August PM Modi has tweeted about great news for environmental lover . He tweeted that...