पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली ( नकीब ) येथील अवैध देशी दारू विक्रीची दुकाने सुरू झाली आहेत . त्यामुळे महिलांसह ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेत २० सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत येथील अवैध दारू दुकाने तत्काळ बंद करण्याबाबतचा ठराव चिंचोली ग्रामस्थांतर्फे संमत करण्यात आला . याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे . चिंचोली नकीब ( ता . फुलंब्री ) येथील आक्रमक झालेल्या महिलांचा रोष बघून ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र जंगले यांनी महिलांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केले . गावातील अनेक तरुण , नागरिक दारूच्या आहारी जात असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे . तसेच दारूपायी गावात भांडणतंटे वाढत आहेत . एक महिन्यात संपूर्ण दारू विक्री बंद करावी , अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामूहिक उपोषण करण्यात येईल , अशा इशारा वर्षा वाढेकर , वैशाली वाढेकर , पूजा जंगले , ज्योती वाढेकर , मनीषा जंगले , शोभा जंगले , कमल जंगले , फर्जना इम्रान शहा , शीतल वाडेकर , रोहिणी जंगले , शोभा सोनवणे , वैष्णवी पंडित , अफसाना शहा आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत