औरंगाबाद:मटक्याच्या अड्ड्यावर काम करणाऱ्या नोकराचे अपहरण करून त्याला मारहाण करत लूटमार झाल्याप्रकरणी गजानन बबन दौंडकर ( रा . कांचनवाडी ) वर पीडित चंद्रशेखर भीमराव सोनटक्के यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . यात न्यायालयाने दौंडकरचा १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला . तक्रारीनुसार , चंद्रशेखर गजाननच्या मटक्याच्या अड्ड्यावर नोकर म्हणून काम करतात . दोन महिने हॉटेलवर काम केल्यानंतर गजाननने बळजबरीने मटक्याचे काम करायला लावले . त्यानंतर मटक्याचे काम करताना चिठ्ठ्या लिहिण्यास सांगून ७० हजारांचा घोळ केल्याचा आरोप केला . ते परत मिळण्यासाठी १ सप्टेंबर रोजी गजाननने चंद्रशेखरचे अपहरण करून वेळोवेळी वेगळ्या ठिकाणी नेत मारहाण केली . तसेच , ५ हजार व मोबाइल हिसकावला . सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच गजाननला अटक केली . त्यात आरोपीने अॅड . कार्तिक आर . शर्मा यांच्यामार्फत सत्र न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला . युक्तिवादादरम्यान शर्मा यांनी हा प्रकार चुकीच्या कलमांतर्गत दाखल केल्याचा दावा केला आहे