मातोश्रीवर प्रवेश मिळवण्यासाठी कँबिनेट मंञ्यांना गेटवर थांबू ताटकळत ठेवायचेः रोहयो मंञी संदीपान भुमरे
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
"पाचोड येथील कार्यक्रमात ठाकरेवर साधला निशाणा"
पाचोड(विजय चिडे) मुख्यमंत्री असतांना उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीच्या गेटवर तैनात सुरक्षा पोलीस कर्मचारी तासनतास थांबवून ताटकळत ठेवायचे तरीही प्रवेश काही मिळायचा नाही कँबिनेट मंञ्यांना दोन तीन दिवस भेटीसाठी वाट पाहावी लागायची तर राज्यमंञी आमदार खासदार इतर पदाधिकाऱ्यांची काय अवस्था असेल याचे भान तरी त्यांना कधी उमगले असणार का!?असा सवाल करत राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंञी संदीपान पा.भुमरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवर चौफेर टीका केली.रोहयो मंञी संदीपान भुमरे यांची नुकतेच औरंगाबाद जिल्ह्याच्या पालमंञीपदी निवड झाल्याने त्यांच्या मूळ गावी पाचोड ता.पैठण येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी दि,२६ सकाळी दहा वाजता नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी बोलतांना ते सांगत होते.तत्पूर्वी पैठण चौकात जेसीबीने रोहयोमंञी भुमरेंना मोठा हार घालण्यात आला त्यानंतर बसस्थानक ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत भव्य रँली काढण्यात आल्याने ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येत होते
यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंञी बदमराव पंडीत,जिल्हाप्रमुख रमेश पवार,कृषि,उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजुनाना भुमरे ,जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास भुमरे,पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे,उपसरपंच शिवाजी भालसिंगे,पंचायात समितीचे उपसभापती कृष्णा भुमरे,माजी सरपंच अंबादास नरवडे सोसायटीचे चेअरमन जीजा भुमरे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना रोहयो मंञी भुमरे याँनी खैरे दाने गोड या जोडीचा खरपूस समाचार घेतला त्यांनी बोलतांना सांगितले की,जनतेंनी चंद्रकांत खैरेंना वीस वर्ष खासदारकीला निवडूण दिले परंतु त्यांनी जिल्हाची पूर्ण वाटच लावून टाकली.त्यांच्या कार्यकालात कुठेच विकास कामे झाल्याचे दिसत नाही त्यांना नुसते जाती पातीच्या राजकारण करण्यापलीकडे दुसरे काहीच करता आले नाही.औरंगाबाद शहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खैरेमुळेच सुटू शकला नाही. यापुढे त्यांनी आता फक्त देव देवातांचे पूजा अर्चाना करण्यातच वेळ घालावा यापुढे ते निवडणुकीत कधीच विजयी होऊ शकणार नाही.तसेच आम्ही जर उठाव केला नसता तर अंबादास दानवेंना कधीच विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता होता आले नसते.त्यांच्या जवळ सरकारवर टिका करण्याशिवाय काहीच उरलेले नाही असे ही रोहयोमंञी भुमरेंनी खैरे दानवे यांच्या विरुध्द बोलतांना चौफेर टिकास्ञ सोडले.तसेच औरंगाबाद शहराचा पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत .शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन रोहिञ असो की कमी दाबाचा वीज पुरवठा असे प्रश्न तात्काळ सोडले जाईल.
पुढे बोलतांना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पैठण तालुक्साठी आतापर्यंत दोन हजार कोटीचा निधी दिला. ब्रम्हगव्हाण योजने साठी ८९० कोटी मंजूर केल्याने शेतकऱ्यांची २० हजार हेक्टर ओलीताखाली येणार आहे येत्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. याच प्रमाणे मराठवाडा वाँटर ग्रीड योजनेला पैठण तालुक्यातन प्रारंभ होणार असल्याने जायकवाडी धारणतून प्रत्येक गावाला फिल्टर पाणी मिळणार आहे.संत ज्ञानेश्वर उद्यानाचा लवकरच कायपालट होणार आहे सुरु झाल
विधानसभेची निवडणूक भाजपसोबत युतीत राहून लढलो त्यामुळे बहुमत मिळाले लोकांना वाटले युतीचे सरकार स्थापन होईल मात्र चिञ उलट झाले ज्यांच्या विरुध्द,आम्ही लढलो होतो त्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करावी लागेल याचा कधीच विचार केला नव्हता त्यामुळे शिवसेनेचे आमदार खासदार नाराज होते त्यामुळे प्रवाहाच्या विरोधात आम्ही जी लढाई लढलो ती सोपी नव्हती. एका विचाराची लढाई लढलो, आम्ही मंत्री होतो तरी त्यावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडलो. ऐतिहासिक क्रांती म्हणून या घटनेकडे पहिले गेले. ३३ पेक्षा जास्त देशांनी ही घटना पाहिली. नवीन नवीन उपमा, टोपण नाव दिले, पण आम्ही घाबरलो नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत घाबरलो नाही. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचे धाडस केले. बाळासाहेबांचे विचार संपवण्याचा घाट घालण्यात येत होता
या कार्यक्रमास भागवत नरवडे, माजी सभापती नंदु पठाडे,,नितीन वाघ,भाऊसाहेब गोजरे, रियाज पटेल,अकील पटेल,राजु निर्मळ,संदीप काळे,मिठ्ठु नन्नावरे,नईम पटेल,वसंत पवार,दताञय भुमरे,आबासाहेब भुमरे,रहीम बागवान,रफीकभाई बागवान,आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.