महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमधील सर्व परिसरातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या संकल्पनेतून अकलूज मध्ये १६ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर पर्यंत जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. दहाव्या दिवशी अकलूजमधील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर कॉर्नर सभा घेऊन जनसंवाद यात्रेचा | पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला.
जनसंवाद यात्रेच्या दहाव्या दिवशी अकलूजधील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे स्मारक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अँड अविनाश काले, सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष अशोक गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक चे जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद, लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जाकीर शेख, अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहीम शेख, सचिव जुबेर बागवान, उपाध्यक्ष इरफान बागवान, उदय कांबळे, बाळू आण्णा खिलारे, सोमनाथ हुलगे, धवल कांबळे यांच्यासह अकलूजमधील जनता मोठया प्रमाणावर उपस्थित होती.