पाटोदा (प्रतिनिधी) भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जणकल्याणकारी योजना व सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटोदा नगरपंचायत अंतर्गत दिनांक २५/९/२०२२ रोजी मोठ्या उत्साहात ८ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या शहरातील, वाड्या वस्त्या वरील काही सिमेंट काॅंक्रेट रस्त्याचे लोकार्पण सोहळा व नविन सिमेंट काॅंक्रेट रस्त्याचे भूमिपूजन करण्याचा शुभारंभ आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पाटोदा शहरातील नागरिक उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवराचे स्वागत पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्ष, गटनेते, उपनगराध्यक्ष,सर्व सभापती व सर्व नगरसेवक यांनी केले आहे.गेल्या पाच वर्षांत आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून पाटोदा नगरपंचायत अंतर्गत मागेल त्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल,रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल, वाड्या वस्त्याला सिमेंट काॅंक्रेट रस्ते,सभागृह अशा प्रकारचे अनेक कामे करून दिल्या मुळे पाटोदा शहरातील नागरिकांनी दुसऱ्या टर्मलाही आमदार धस यांच्या ताब्यात नगरपंचायत दिली आशे आपले प्रस्ताविक भाषणात मत गटनेते बळीराम पोटे यांनी व्यक्त केले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला सरपंच,जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक पद दिली पद नसते दिले तरी शेवटच्या श्वासापर्यंत आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आपल्या मनोगत व्यक्त पर भाषणात नगरसेवक सय्यद आबुशेठ यांनी आपले मत व्यक्त केले यानंतर साधुसंत व मौलाना यांनी आपले मत व्यक्त केले यानंतर आमदार सुरेश धस बोलताना मटले पाटोदा शहरांनी मला भरभरून दिले पाटोदा शहराचा नागरिकांच्या विश्वास तडा जाऊन देणार नाही शहरातील पाणी प्रश्न, रस्ते,नाल्या इत्यादी सर्व प्रश्न मार्गी लावूत असे मत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले पाटोदा तालुक्यात पहिल्यांदाच वाजत गाजत विकास कामाचे मोठ्या थाटा माटात विकास कामाचे उद्घाटन यामध्ये माऊली नगर येथील सिमेंट काॅंक्रेट रस्ता,प्रभाग क्रमांक ४ मधील बर्डे वस्ती अंतर्गत सिमेंट काॅंक्रेट रस्ता व बिनवडे वस्ती सिमेंट काॅंक्रेट रस्त्याचे लोकार्पण तसेच प्रभाग क्रमांक १३ मधील १ कोटी ७५ लक्ष रुपयांचे राऊत वस्ती ते रेणुका माता सिमेंट काॅंक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे,प्रभाग क्रमांक १४ मधील ४० लक्ष रुपयांचे सुर्यभान जाधव यांच्या घरापासून ते लामजे यांचे घर पाट रस्ता व नाली बांधकाम करणे,हिंदू स्मशानभूमी ८० लक्ष रुपयांचे जोड रस्ता सिमेंट काॅंक्रेट करणे, प्रभाग क्रमांक १३ मधील मंगेवाडी अंतर्गत ५० लक्ष रुपयांचे सिमेंट काॅंक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक १४ मधील ५० लक्ष रुपयांचे तुपे यांचे घर ते फाटे यांचे घर सिमेंट काॅंक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक ४ मध्ये ४० लक्ष रुपयांचा सिमेंट काॅंक्रेट रस्ता करणे, प्रभाग क्रमांक १४ मधील ५० लक्ष रुपयांचे संदीप जावळे यांचे घर ते बबन वीर यांचे सिमेंट काॅंक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक १४ मधील ५० लक्ष रुपयांचे रामेश्वर जाधव यांचे घर ते गुंड यांचे घर ते धवन यांचे घर सिमेंट काॅंक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे,५५ लक्ष रुपयांचे पढीयार स्वीट होम ते मार्केट कमिटी सिमेंट काॅंक्रेट रस्ता करणे, प्रभाग क्रमांक १४ मधील २० लक्ष रुपयांचा प्राध्यापक काॅलनीकडे जाणार सिमेंट काॅंक्रेट रस्ता करणे, प्रभाग क्रमांक २ मध्ये १० लक्ष रुपयांचे मुख्य रस्ता माऊली नगर ते ससाणे यांचे घर सिमेंट काॅंक्रेट रस्ता करणे,प्रभाग क्रमांक १ मध्ये २० लक्ष रुपयांचे सिमेंट काॅंक्रीट रस्ता करणे,अल्पसंख्याक योजनेअंतर्गत इदगाह टेकडी सिमेंट काॅंक्रीट रस्ता करणे १५ लक्ष रुपये,भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत २० लक्ष रुपयांचे प्रभाग क्रमांक ५ सय्यद नगर मध्ये सिमेंट काॅंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,प्रभाग क्रमांक १४ मध्ये ३० लक्ष रुपयांचे माऱोती मंदिराजवळ परिसर मध्ये सिमेंट काॅंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक १६ मध्ये ३५ लक्ष रुपयांचे बाबा कुरेशी ते अयशा मज्जिद सिमेंट काॅंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे व प्रभाग क्रमांक १ मध्ये भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत २० लक्ष रुपयांचे कुचेकर यांचे घर ते टेकाळे यांचे घर सिमेंट काॅंक्रीट रस्ता करणे अशा एकूण ८ कोटी ५७ लक्ष रुपयांचा कामाचा लोकार्पण सोहळा व नविन सिमेंट काॅंक्रीट रस्ता व नाली बांधकाचे भुमिपुजन आमदार सुरेश धस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात वाजत गाजत करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,गटनेते,सर्व सभापती व सर्व नगरसेवक यांच्या सह पाटोदा शहरातील नागरिक व आमदार सुरेश धस समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटनेते बळीराम पोटे व नगरसेवक सय्यद आबुशेठ यांनी केले तर आभार नगरसेवक राजू जाधव यांनी मानले.
आमदार धस यांच्या माध्यमातून पाटोदा शहराचा होऊ लागला कायापलट - नगरसेवक सय्यद आबुशेठ
जे पाटोदेकराच्या मनात तेच आमदार सुरेश धस यांच्या मनात - बळीराम पोटए
जसा आज पाऊस पडला तसाच आमदार धस यांनीही विकास निधीचा पाऊस पाटोदा शहारावर पाडला - राधाताई सानप महाराज