*चारठाणा बस स्थानक परिसरात नो पार्किंग झोन, लाल परि पुन्हा गावातून धावनार*

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

चारठाणा

     चारठाणा बस स्थानक परिसरात खाजगी वाहनांच्या त्रासाला कंटाळून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस गावात येणे बंद झाले होते परंतु ग्राम पंचायत व पत्रकार मंडळींनी पुढाकार घेऊन बस स्थानक परिसरात नो पार्किंग झोन निर्माण केला असून आत्ता मात्र लाल परि पुन्हा गावातून धावणार आहे त्यामुळे गावतिल नागरिकातुन समाधान व्यक्त होत आहे. 

        बाबत अधिक माहिती अशी की, चारठाणा बस स्थानक परिसरात खाजगी वाहनांची वर्दळ राहत असल्याने परिवहन महामंडळाच्या बसेसला गावातून फेरी मारण्यास अडचण निर्माण होत होती परिणामी या त्रासाला वैतागून राष्ट्रीय परिवहन महामंडळाने गावातून फेऱ्या बंद केल्या होत्या परंतु चारठाणा व आजूबाजूच्या जवळपास 40 खेड्यातील नागरिकांना चारठाणा फाट्यावरून पाई ये-जा करावी लागत होती त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय चारठाणा व पत्रकारांनी पुढाकार घेत चारठाणा पोलीस प्रशासनाच्या मदतीने बस स्थानक परिसरात नो पार्किंग झोन निर्माण केला त्यानंतर ही माहिती जिंतूर आगाराला कळवल्यानंतर आज दिनांक 26 सप्टेंबर वार सोमवार रोजी सकाळी राष्ट्रीय परिवहन मंडळाची जिंतूर-सेलु पहीली बस गावात येणे सुरू केले त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून हळु हळु परभणी विभागातील परिवहन महामंडळाच्या सर्व गाड्या गावातून धावणार आहेत त्यामुळे नागरिकांनी चारठाणा फाट्यावर न जाता बस स्थानक परिसरातच थांबावे तसेच कोणती गाडी गावात येत नसेल तर त्यांना गावात आनण्याची विनंती करावी नाहीच ऐकल्यास त्या बाबत आपण परिवहन मंडळास रितसर तक्रार करुन गाड्या गावातून नेन्यास भाग पाडुयात असे आव्हान सरपंच अनिरुद्ध चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले आहे. चारठाणा बसस्तानक परिसरात या बंद नंतर पहिल्यांदाच लाल परीचे आगमन होताच चारठाणा गावकऱ्यांच्या वतीने चालक व वाहक यांचा सत्कार करून राष्ट्रीय परिवहन महामंडळाचे स्वागत करण्यात आले या वेळीचालक एम.यू.राठोड ,वाहक आर .के.गायकवाड यांच्यासह सरपंच अनिरुद्ध चव्हाण ,उपसरपंच वाजेद कुरेशी ,माजी उपसरपंच तहेसीन देशमुख ,सतीश देशमुख ,पत्रकार मुस्ताक अहेमद, प्रभाकर कुरे,राहुल चव्हाण, रुस्तुम देशमुख, एकनाथ इंगळे, कृष्णा सोनटक्के, दशरथ झोपडे, काशिनाथ खाडे आदी उपस्थित होते.