पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चिंतन करणे तसेच आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळात परिसरातील नागरिकांचा जाहीर प्रवेश यासाठी ताडकळस येथील नवा मोंढा येथे भव्य अशा 'शेतकरी मेळावा आणि प्रवेश सोहळा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन म्हणून गंगाखेड विधानसभेचे लाडके व लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या शुभहस्ते झाले.

    कोणत्याही संकटात माझ्या पाठींशी खंबीरपणे उभे राहाणारे माझे मतदार आणि सर्वसामान्य जनता हिचं माझी ताकद आणि ऊर्जा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सुध्दा सावली सारखे माझ्या सोबत राहा, असे आवाहन आ.डॉ.गुट्टे साहेब यांनी उपस्थितांना केले.

याप्रसंगी ताडकळस, खांबेगाव, रामापूर, कळगाव, वझुर, गोळेगाव, फुलकळस, महागाव आणि शिरकळस मधील शेकडो नागरिकांनी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळात प्रवेश जाहीर केला. 

      यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन दिगंबर अण्णा शिराळे होते तर मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादजी मुरकुटे, रासप जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, माजी सैनिक शेख गुलाब नबी साहेब, पूर्णा तालुकाध्यक्ष गणेशजी कदम, तालुकप्रभारी कैलास काळे, प्रभारी सुभाषराव देसाई, रासप तालुकाध्यक्ष जगन्नाथ रेनगडे,या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मारोती मोहिते, सुदाम वाघमारे, हबीब पठाण, नारायणराव मोरे, पशुपती शिराळे, विकास अंभोरे, बापूराव डुकरे, शिवाजीराव अवरगंड, उत्तमराव शिंदे, दत्तराव पौळ, वेंकटेश पवार, नवनाथ भुसारे, राजेभाऊ गाडेकर केशवराव गव्हाळे, कैलास शिंदे, मारोती मोहिते, दीनानाथ दुधाटे, शेख इस्माईल, विशाल गाढवे, उत्तमनाना आंबोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.