'लम्पी' मुळे पाचोडच्या प्रसिद्ध बैल बाजाराला लॉकडाऊन
"कोरोनानंतर लम्पीने केला जनावरांचा बाजार बंद कोट्यावधीची उलाढाल ठप्प"
पाचोड(विजय चिडे),जनावरांमधील लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचा बाजार भरवण्यावर शासनाकडून प्रतिबंध घालण्यात आल्याने रविवारी भरणाऱ्या मराठवाड्यातील प्रसिद्ध व नंबर एकचा नावलौकिक असलेला पाचोड ता.पैठण येथील गुरांचा बाजाराला देखील लाँकडाऊन लागल्याने एकरव्ही जनावरांच्या गर्दीने गजबजलेल्या बाजारादिवशी एकही जनावरे विक्री साठी दाखल झाले नसल्याने बैल बाजारातखेरीदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने बाजार मैदानात नुसते सर्वञ शुकशुकाट पाहावयास मिळाले.
गुरांच्या संसर्गजन्य आजार असलेल्या लम्पी स्कीनचा सर्वञ झालेल्या फैलावमुळे गुरांना या रोगाची लागण होत असल्याने शेतकरीवर्ग चांगलाच धास्तवल्याचे दिसून येत आहे.
शासनाकडून हा रोग आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणासह विविध पातळीवर उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.दरम्यान लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने जनावरांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने शेतकरीवर्ग चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसून येते.पशुधनावर आलेल्या संकटामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
महिनाभरापासून जनावरांना लम्पी आजाराची लागण होण्यास सुरूवात झाली अगोदर काही मर्यादित ठिकाणाच्याच जनावरे लम्पीच्या कचाट्यात सापडले परंतु संसर्गजन्य हा आजार असल्याने हळूहळू एकातून दुसऱ्याला या आजाराची लगेच लागण होत आहे. त्यामुळे हा आजार सर्वत्र पसरला असून यामुळे जनावरे मृत्यूमुखी पडत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाचोडचा बैल बाजार हा प्रसिध्द गुरांचा बाजार म्हणून ओळखला जातो.या ठिकाणी अहमदनगर,बीड,जालना,शेवगाव,पाथर्डी,घनसांवगी,गेवराई,माजलगाव,मंठा,तिर्थपुरी,अंबड,भोकरदन,जाफराबाद,देऊलगावराजा आदी ठिकठिकाणाहून जनावरे विक्री व खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतात.शेतकरी व व्यापाऱ्यांच्या देवाण घेवाण व्यवहारातून एका दिवसामध्ये कोट्यावधीची उलाढाल होत असते.परंतु लम्पीचा फैलाव होऊ नये यासाठी बैल बाजार भरवण्यावर शासनाकडून बंदी आणण्यात आली आहे.
बाजारात येणारे जनावरे हे वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात त्यामुळे एखाद्या लम्पी आजाराच्या जनावरामुळे इतर निरोगी जनावरे सुध्दा संसर्गात सापडून आजारी पडण्याच्या भीतीने जनावरांच्या बाजारावर लाँकडाऊनची घोषणा करण्यात आली.पैठण तालुक्यात आतापर्यंत संशयीत दहा बारा जनावरांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. या रोगाचा शिरकाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर असून गुरांच्या लसीकरणास सुरुवात केली आहे आतापर्यंत असंख्य पंधरा ते वीस हजार गुरांना लस देण्यात आली आहे लम्पी स्कीन हा आजार गाय व म्हैसवर्गीय यांना होणारा विषाणुजन्य आजार असून, तो बाधित जनावराच्या लाळेतून, मुत्रातून, तसेच बाधित जनावराच्या अंगावर बसणाऱ्या माशी,गोचीड यांचेद्वारे निरोगी जनावरामध्ये होतो.
चौकट-
कोरोनानंतर लम्पीमुळे गुरांच्या बाजारावर लाँकडाऊन.
कोरोना प्रादुर्भावामुळे पाचोडचा आठवडी बाजार पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तब्बल दीड वर्ष बंद होता आता लम्पीमुळे जुरांचा बाजार भरवण्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे बाजारात ना गुरांच्या हंबरण्याचा आवाज, ना गळ्यातील घुंगरांचा किणकिणाट, सारे काही लम्पीमुळे लॉकडाउन झाले आहे.जनावरांचा बाजार बंद असल्याने ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून बाजार बंद असल्यामुळे याचा फटका नामवंत पाचोडच्या जनावरांच्याही बाजाराला बसला. नेहमी घुंगरांचा आवाज, बोटांच्या हालचालीवर होणारे व्यवहार, बैलजोडीच्या खरेदी विक्रीतून होणारे कोट्यावधीचे व्यवहार आजरोची बंद आहे.लहान मोठे व्यवहार यंदा थांबले आहेत.
पाचोड येथे भरणाऱ्या बैल बाजारात शुकशुकाट दिसत आहे.(छाया-विजय चिडे,पाचोड)