बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

"वैद्यकीय अधिकारी नसल्याने महीलेची वाटेतच प्रसुती"

पाचोड(विजय चिडे)पैठण तालुक्यातिल बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर शासन दर महीन्याकाठी लाखो रूपये खर्च येथील कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पगारावर करीत आहे. मात्र हे अधिकारी मुख्यालयी राहत नाही तर येत पण नाही.त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रूग्णांना'इकडे आड, तिकडे विहीर' अशी अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या  रुग्णांची झाली आहे.खासगी रुग्णालयातील उपचार खिशाला परवडत नाही आणि प्राथमिक

 आरोग्य केंद्रात'राम' राहिला नसल्याने रुग्णांची मोठी फरफट होत आहे.नुकतेच रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गावतांडा येथील रेश्मा शाहरुख शेख यांना प्रसुतीसाठी बालनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता यावेळी रात्री याठिकाणी दोन पैकी एकही वैद्यकीय अधिकारी कार्यरत नसल्यामुळे शेख यांना बिडकीनला प्रसुती करण्यासाठी जा असा सल्ला देण्यात आला. 

मात्र, रेश्मा शेख यांना त्यांते चे नातेवाईक रूग्णवाकाव्दारे बिडकीनला प्रसुतीसाठी घेऊन जात असताना त्यांच्या पोटात कळा निघाला सुरूवात झाल्या आणि त्याची निलजगाव नजदिकच रूग्णवाहिकेत प्रसुती रस्ताच झाली आहे.आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी असल्यामुळे रूग्णांना वेळेवर सुविधा मिळत नाही असे जनतेतून बोले जात आहे. बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आसपासच्या २५ गावांचे रूग्ण येतात.परंतु,बालानगरला जाण्यासाठी रस्तेही चांगले नाहीत.आरोग्य केंद्रात नवीन रूग्णवाहिका देण्यात आली असून अडचणीच्या वेळेस रूगांना खासगी वांहनाचाच सहारा घ्यावा लागतो.

एकवर्षापूर्वी लाखो रूपये शासनाने खर्च करून येथे शवविच्छग्रह बांधण्यात आला. मात्र येथे कार्यरत असणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या नुसते मनमानी कारभार सुरू आहे.या ठिकाणी शवविच्छेदनासाठी रूम असतानाही बिडकिन किंवा पैठण येथेच जावे लागते याठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी असतानाही वेळे कोणी राहत नसल्यामुळे रूग्णांची परवड होत आहे.रिक्त जागा भरण्याकडे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे रुग्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे तातडी रिक्त पदे भरूण सोयीसुविधा देण्याची मागणी बालानगर परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.