औरंगाबाद : फोस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक मेडिकल महाविद्यालयात शनिवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . माजी जि. प. अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले . यात २० पेक्षा जास्त दात्यांनी रक्तदान केले . या वेळी प्राचार्या डॉ . अनुपमा पाथ्रीकर , डॉ . मयूर सोनवणे , डॉ . जे . डी . पाटील , डॉ . लीना गुंजाळ आदी उपस्थित होते .