सोयगाव तालुक्यात सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी . तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे , मंडप , रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात , असे आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निरज बिदे यांनी केले आहे . नवरात्र उत्सव दि . २६ / ९ / २२ सप्टेंबरपासून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे . महावितरणकडून नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती वीज दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे . मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे . मंडपातील वीजयंत्रणेचे अथिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी . मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो . हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड देण्यात यावा . स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लाववी . विजेच्या लघुदाब , उच्चदाब वाहिनी व रोहित्रांचा नवरात्र उत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही , याची काळजी घ्यावी . उत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे . नवरात्र उत्सवाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत क्षेत्रातील ३३ केव्ही उपकेंद्र सावळदबारा महावितरणचे सहाय्यक अभियंता योगेश जाधव व कर्मचारी दिपक नेवारे , मंगेश धनोकर , ज्ञानेश्वर घोडके , प्रदिप जाधव , विजय बावणे , अशोक आरके ब्राम्हणे यांच्याशी सावळदबारा परिसरातील नवरात्र उत्सव मंडळांनी भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत . तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले १ ९९ २ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहन उपकार्यकारी अभियंता निरज बिदे , सहाय्यक अभियंता योगेश जाधव व महावितरणकडून करण्यात आले आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
MP Assembly Election: Akhilesh Yadav ने Madhya Pradesh के छतरपुर में आदिवासियों के साथ खाया खाना
MP Assembly Election: Akhilesh Yadav ने Madhya Pradesh के छतरपुर में आदिवासियों के साथ खाया खाना
Eknath Shinde, Aaditya Thackeray यांच्या सुरक्षेबद्दल काय म्हणाले? | Shiv Sena
Eknath Shinde, Aaditya Thackeray यांच्या सुरक्षेबद्दल काय म्हणाले? | Shiv Sena
यूथ कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष बोले- अधिकारी को ठोक लिया करो:विधायक ने कहा - बाद में हम निपट लेंगे
राजस्थान यूथ कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष ने कार्यकर्ताओं से कहा है कि अधिकारी अगर ज्यादा परेशान करे...
Patan : જિલ્લાના સાંતલપુર તાલુકામાં લોદરા ગામ દારૂબંધી.
Patan : જિલ્લાના સાંતલપુર તાલુકામાં લોદરા ગામ દારૂબંધી.