नाशिक
महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोशियन व नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षे आतील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलन येथे दिनांक 12 ते 14 सप्टेंबर 2022 रोजी उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये प्रथम क्रमांक अहमदनगर दुसरा, क्रमांक ठाणे ,आणि तिसरा क्रमांक औरंगाबाद (संभाजीनगर) चौथा क्रमांक उस्मानाबाद ,
मुली संघामध्ये प्रथम क्रमांक भंडारा दुसरा क्रमांक सी बी एस सी नाशिक तिसरा क्रमांक नाशिक ग्रामीण या संघांना मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनासंबंधी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोशियनच्या सचिव मीनाक्षी गिरी टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे ,महेश मिश्रा , विलास गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड सहसचिव धनंजय लोखंडे इत्यादी उपस्थित होते.