पैठण : तालुक्यातील होनोबाचीवाडी येथे आज दि.24सप्टेंबर 2022 रोजी सामाजिक कार्यकर्ता तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका चिटणीस गजानंद बोहरा यांच्या पुढाकाराने लम्पी आजाराचे गाय वर्गीय जनावरांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे.पशुधन विकास अधिकारी डॉ.पांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली परिचर दिगंबर राठोड,नवनाथ फरताडे,सहकारी शुभम आगळे,आकाश झिंजुर्डे यांनी लसीकरण केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांनी डॉ पांडवे यांच्या वतीने पशुपालकांना माहिती दिली की,लम्पी हा आजार फक्त गाय वर्गीय प्राण्यांनाच होत असल्यामुळे इतर जनावरांना लस देण्याची आवश्यकता नाही.तसेच गाईचे दूध खाल्ल्यामुळे माणसांना हा आजार होत नाही.अफवांवर विश्वास ठेवु नका,शंभर टक्के लसीकरण करुन घ्या,लम्पी सारखी लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांना कळवा लस मोफत आहे.खाजगी डॉक्टरांकडुन विलाज करु नका इत्यादी माहिती सामाजिक कार्तकर्ता गजानंद बोहरा यांनी दिली.यावेळी पुनम,प्रेमसिंग बहुरे,कैलास, सुजरदास,कचरुदास,राजकुमार,

मनोज,योगेश, रवी वैष्णव,उदल महाराज,लालु बिघोत,लालु जारवाल,बंडु डेडवाळ,निहालसिंग सुलाने,भाऊसाहेब आरसुड,रतन दगडु, मोघे,इत्यादी पशुपालक उपस्थित होते.