गंगापूर तालुक्यातील गळनिंब येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक २० चे दुकानदार बाबासाहेब पाचपुते हे स्वस्तधान्य दुकानाच्या माध्यमातून गैरव्यवहार करीत आहेत . या विरोधात दंडात्मक कारवाई करून चौकशी करावी अशी मागणी गळनिंब येथील महिला पुरुष नागरिकांनी तहसीलदार सतीश सोनी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , गळनिंब गावातील स्वस्त धान्य दु.नं. २० ( ऑनलाईन दु.नं , ५१५२१८००४०७ ) वर नेमलेला दक्षता कमिटीला न दर्शवता आलेले धान्य उतरवणे , कमी जादा प्रमाणात काढणे , आधार प्रमाणीकरण मशीनचे कारण सांगून राशन न वाटणे , वजन काटा डिस्प्ले नागरिकांना न दाखवणे , अल्प उत्पन्नगटात साठी आलेले धान्य जास्त दराने विक्री करणे , कमी राशन देऊन जास्त राशन दिल्याचे नोंद करणे , शिल्लक राशनाची काळ्याबाजारात विल्हेवाट लावतो या स्वस्त धान्य दुकानाला वेळेचे बंधन नाही : स्वस्त धान्य दुकान महिन्यातून दोन तीन दिवस उघडे असते . उर्वरित दिवस दुकान हे बंदच असते . राशन दुकान उघडण्याची वेळ व बंद करण्याची वेळही दुकानाला नसून सदरील दुकान रात्री अपरात्री उघडून स्वस्त धान्य हे काळ्या बाजारात उच्च दराने विकले | जाते . तसेच गुरुवारी आठवडी बाजार असतानाही या दिवशी तर चक्क दुकान बंद ठेवली जाते . काट्याला एकच डिस्प्ले असून तोही फक्त स्वस्त धान्य दुकानदारलाच दिसतो . त्यामुळे गावातील ग्रामस्थांना वजनात तफावत होत आहे किंवा आपली फसवणूक होते आहे याची शंका नेहमी येत असते . पण राशन मिळणार नाही या भीतीपोटी कोणताही नागरिक तक्रार करण्यास धजावात नाही . असे निवेदनात म्हटले आहे . उशाबाई हिवाळे , सुलभा दहातोंडे , लता उमाप , ललिता कुंढारे , कडूबाई कुंढारे , आशाबाई घंटे , मंदाबाई उमाप , शिलाबाई घंटे , बापु दहातोंडे , गणेश घटे आर्दीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत .