वैजापूर शहरासह तालुक्यात नावलौकिक असणाऱ्या क्रांती नवरात्र उत्सव सन २०२२ ची कार्यकारिणी जाहीर झाली. हिंदवी स्वराज्य प्रतिष्टान व क्रांती मित्र परिवार आयोजित क्रांती नवरात्र उत्सव मागील ३३ वर्षापासुन शहराच्या सौंदर्यात भर घालणार व महिला, तरुण-तरुणीसाठी एक सुरक्षित व्यासपीठ निर्माण करणार एकमेव मंडळ असुन या माध्यमातुन दरवर्षी विविध उपक्रम आयोजित केले जातात. मंडळाच्या माध्यमातुन या वर्षी रास दांडिया, भव्य आनंद नगरी जत्रा यासह विशेष आकर्षण म्हणुन भागवताचार्य देवी वैभवी श्रीजी वृंदावन धाम यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री देवी भागवत महापुराण ज्ञानयज्ञ कथा सोहळा आयोजित केला असुन याचा सर्व शहर व तालुका वासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन क्रांती मित्र परिवार तर्फे केले आहे. यावर्षी देखील सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवाची कार्यकारिणी क्रांती मित्र परिवाराचे मार्गदर्शक गणेश राजपुत,सोमु सोमवंशी, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष दिनेश राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाली. क्रांती नवरात्र उत्सवाची कार्यकारिणी खालील प्रमाणे; १ ) किरण विजय व्यवहारे ​​:- अध्यक्ष २) प्रशांत मनोहर सोमवंशी ​​:- उपाध्यक्ष ३) राहुल दिलीप कुंदे ​​​:- सचिव ४) अमृत शिवाजी शिंदे ​​​:- कार्याध्यक्ष ५) दीपक नामदेव बोर्डे ​​​:- उपकार्याध्यक्ष ६) गणेश राजेंद्र अनर्थे ​​​:- सहसचिव ७) गणेश कडु पा.पवार ​​​:- कोषाध्यक्ष ८) मयुर गोटुसिंग राजपुत ​​:- सहकोषाध्यक्ष या निवडीबद्दल देवदत्त पवार, प्रेम राजपुत, नवीन श्रीवास्तव, गणेश गाडे, अमोल बोरनारे, प्रवीण कोतकर, राजकुमार जाधव, संदीप डोंगरे , अंकुश तुपे, अभिजित कुंदे, संदीप बनकर, बबलु बस्वेकर, सत्यजित सोमवंशी, विशाल पटेल, शैलेश पोन्दे, योगेश बोर्डे, संदीप त्रिभुवन, ऋतुराज सोमवंशी, योगेश राजपुत, शहाणे सर, समाधान पाटील, ऋषी अनर्थे, सम्राट राजपुत, सोनू राजपुत, पंकज व्यवहारे, जितु सामृत,किरण मालोदे,महेश राजपुत,प्रदीप चव्हाण, सौरभ तांबे, मंगेश नाईकवाडी, शुभम मोरे, रणजीत जगताप, अक्षय बोरनारे, शुभम पवार क्रांती मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं