बीड, दि. 24 (जि. मा. का.) :- बीड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड यांच्या वतीने दि. २५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यामध्ये नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी, याकरिता ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

        एव्हरेस्ट प्लीट प्रायव्हेट लिमिटेड ठाणे या कंपनीमध्ये टेलीकॉलर एकूण पदे - १०, शैक्षणिक पात्रता बारावी पास, वयोमर्यादा- १८ ते ३०, टेक्नीशियन - एकूण पदे - २० शैक्षणिक पात्रता १० वी पास, वयोमर्यादा - १८ ते ३०, जॉब लोकेशन पुणे / ठाणे व रुबीकॅन फॉरमॅलीटीझ प्रायव्हेट लि . औरंगाबाद येथे ट्रेनीचे एकूण पदे - १० शैक्षणिक पात्रता - डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, डिप्लोमाइन मॅकेनिकल इंजिनिअरिंग इन इंग्लिश मेडियम पास आऊट २०१८ मध्ये किंवा त्यानंतर, वयोमर्यादा १८ ते ३२ असून कामाचे ठिकाण वाळुज, औरंगाबाद येथे राहणार आहे.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी पुढीलप्रमाणे सहभागी व्हावे. सर्वप्रथम www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक ( job seeker ) म्हणून नोंदणी करणे, नोकरी उत्सुक उमेदवारांनी आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन login बटनावर क्लिक करावे. प्रोफाईल मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा बीड जिल्हा निवडुन filter बटणावर क्लिक करावे. आपल्याला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त आयोजित बीड पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा - २ मेळावा दिसू लागेल. त्यातील action या पर्यायाखालील दोन बटणापैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास रिक्त पदे दिसतील. दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. सदर संदेश काळजीपूर्वक वाचावा व 1 agree बटणावर क्लिक करावे. आपल्याला रोजगार मेळाव्यात उपलब्ध ( पदाचे नाव , शैक्षणिक पदे असलेली अर्हता , वयोमर्यादा , आवश्यक कौशल्य , अनुभव , वयोमर्यादा , आरक्षण ) दिसू लागतील, आपल्या शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा, आवश्यक कौशल्य , अनुभव या नुसार पदाची निवड करावी व apply बटणावर क्लिक करावे आपल्याला एक संदेश दिसेल सदर संदेश काळजीपूर्वक वाचावा व ओके बटणावर क्लिक करावे, आपला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदवला जाईल. रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर सदर कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन ( स्काईप , व्हॉटसअप , फोन ) इ . व्दारे संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अडचण आल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02442 299116 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.