केज (प्रतिनिधी) दि. २३ रोजी केज येथील तहसिलदार यांना ढाकेफळ येथील मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी निवेदन देण्यात आले.सदरील माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षांपासून ढाकेफळ येथील बौद्ध मागासवर्गीय समाजाला स्मशानभुमी नाही. व तशी ग्रामपंचायत याला नोंद नाही त्यामुळे गावातील मागासवर्गीय समाजातील व्यक्ती मयत झाला तर अंत्यविधी करण्यासाठी जागा नाही. गावठाणा येथे जी जागा आहे ती सर्व रहदारीचे ठिकाण व समाजातील लोकांच्या घरापासून ३० ते ३५ फुट अंतरावर आहे. त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी अवघड झालेले असून हा वर्षानुवर्षे समाजासमोर अवघडीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या सर्व गंभीर बाबींची दखल घेऊन मा तहसिलदार यांनी ढाकेफळ येथील सर्व मागासवर्गीय बौद्ध समाजासाठी ढाकेफळ येथील सरकारी जागा उपलब्ध करून देऊन व त्याची नोंद संबंधित ग्रामपंचायत रेकॉर्ड ला घेण्यास आदेशित करुन समाजाला न्याय देण्यात यावा अशी ढाकेफळ येथील सर्व मागासवर्गीय बौद्ध समाजातील लोकांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे या वर पत्रकार रंजीत घाडगे, प्रकाश घाडगे, भाऊसाहेब घाडगे, संकेत घाडगे, भास्कर घाडगे, जयसिंग घाडगे, बंडु घाडगे, नवन कस्तुराबाई घाडगे, गंधारी घाडगे, विठ्ठल घाडगे व इतर लोकांच्या सह्या आहेत.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं