'छत्रपती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, व वृक्ष लागवड एक संकल्प ग्रुप, व गावकऱ्यांनी आवाज उठविला असून वाशिम जिल्ह्यातील गोगरी ते शेलुबाजार या रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करून गावकऱ्यांची समस्या सोडवावी अशी मागणी छत्रपती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गणेश नारायणराव बोथे, व वृक्ष लागवड एक संकल्प वृक्ष ग्रुप चे अध्यक्ष विकास कोंगे,व गावकरी मंडळीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाविरुद्ध आवाज उठविला आहे.40 वर्षापासून हा संघर्ष चालू आहे गोगरी ते शेलुबाजार हा रस्ता मुख्य बाजारपेठ सती आई मंदिरापासून निघतो .तर हा रस्ता किमान तीनच किलोमीटर आहे.आणि या रस्त्यावर जवळपास गोगरी ,हिरंगी,खेरडा तथा सोनाळा, जवळपास दहा ते पंधरा हजार लोकसंख्या जोडलेला हा रस्ता आहे.मात्र या रस्त्याची अवस्था मात्र खूप केविल वाणी आहे. त्यामुळे नागरिकांना आठ किलोमीटर फेराने जाऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आणि जीवन सुद्धा धोक्यात घालावं लागतं एक तर वाशिम सिंगल पदरी रोड आहे तर दुसऱ्या बाजूला हायवे आहे.या रोडवर आजपर्यंत अनेक अपघात झाले त्या रोडवर वाहनांची गर्दी होत असते.वाहतुकीची कोंडी आणि हायवे या गोष्टींमुळे कित्येकांचा प्राण गमवावा लागला.तरी याची दखल घेतल्या जात नाही आहे. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा जवळपास ये जा करण्या करिता शालेय विद्यार्थ्यांना जिथे तीनशे रुपये महिना द्यावा लागतो तिथं 700 ते 800 रुपये महिना द्यावा लागतो याबाबत शासनाने दखल घेणे आवश्यक आहे गोगरी येथील नागरिक नारायण रावजी साखरे सांगतात सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला या रस्त्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.आम्ही पूर्ण जीवन या रस्त्यासाठी समर्पित केलं जवळपास 75 ते 80 पर्यंत त्यांचा आता सध्या वय आहे त्यांनी खासदार भावनाताई गवळी पासून तर माजी मंत्री सुभाषराव ठाकरे पर्यंत आमदार लखन मलिक पासून तर मंत्री संजय राठोड पर्यंत अनेकांपाशी निवेदन देत तक्रारी आपल्या माडल्या होत्या.मात्र रस्त्याचे नारळावर नारळ फोडत गेले मात्र रस्ता अजूनही झाला नाही सर्वांनी फक्त आश्वासन दिली काम मात्र केले नाही. फक्त आश्वासन देण्याचे काम होत आहे,असे मत तेथील सर्व गावकरी व्यक्त करीत आहेत.तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी . नाहीतर तेथील आम्ही सर्व नागरिक आमदार खासदारकीच्या मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही, अशा आवाजात छत्रपती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, व गावकऱ्यांनी आवाज उठविला आहे.