*लोकनेते राजारामबापू पाटील यांना आनंदरावबापू पाटील, सादिक खाटीक यांचे अभिवादन !*
*___________________________*
आटपाडी दि १ ( प्रतिनिधी )
महाराष्ट्राचे माजी मंत्री, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंती निमित्त आज इस्लामपूरच्या राजारामबापू साखर कारखाना कार्य स्थळावर बापूंच्या पुतळ्यास आनंदरावबापू पाटील, सादिक खाटीक यांनी फुले वाहून अभिवादन केले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव आटपाडीचे सादिक खाटीक, माडगुळेचे मनोहरपंत विभूते, गळवेवाडीचे शंकर गळवे यांनी कारखाना स्थळावरील बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले .
लोकनेते राजारामबापू पाटील यांचे ज्येष्ट सुपुत्र , कासेगांव शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री . भगतसिंहदादा पाटील यांची यावेळी आटपाडीकरांनी सदिच्छा भेट घेतली . राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.सुश्मिताताई जाधव, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पुजाताई लाड या उपस्थित होत्या .