औरंगाबाद:पडेगावातील वीसवर्षीय तरुण वैयक्तिक कारणांमुळे तणावाखाली गेला होता . सायंकाळी भावासमोरच तो गळफास घेण्यासाठी साडी सोबत घेत खोलीत गेला . त्यामुळे भावाला संशय आल्याने त्याने तत्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधून " माझ्या भावाने खोलीचा दरवाजा बंद केला आहे . त्यामुळे लवकर या , ' अशी विनंती केली . छावणी पोलिस ठाण्याच्या 112 च्या गाडीवरील अंमलदार व्ही . बी . पंडित व एन.एस तांबे यांना नियंत्रण कक्षाकडून कॉल प्राप्त होताच त्यांनी त्या दिशेने धाव घेतली . त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला . तेव्हा त्याने गळफास घेतलेला होता . पोलिसांनी त्याला वर करून तत्काळ कात्रीने फास घेतलेली साडी कापली . त्यानंतर छातीवर वारंवार दबाव टाकत त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत घाटी रुग्णालयात दाखल केले . गुरुवारी रात्रीपर्यंत तो शुद्धीवर आलेला नव्हता . मात्र , उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले . छावणीचे निरीक्षक शरद इंगळे , विशेष पथकाचे उपनिरीक्षक पांडुरंग डाके यांनी दोन्ही अंमलदारांचे कौतुक केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ખંભાત રાલેજ સિકોતર માતાજીના મંદિરેથી બાઇક ચોરાતા ફરિયાદ
ખંભાતના રાલેજ સિકોતર માતાજીના મંદિરેથી બાઇક ચોરાતા ફરિયાદ નોંધાઇ છે.ખંભાત તાલુકાના કલમસર ખાતે...
Bharat Kund: जब श्रीराम गए वनवास, तब यहीं से भरत ने चलाया Ayodhya का राजपाट | Ram Mandir | Aaj Tak
Bharat Kund: जब श्रीराम गए वनवास, तब यहीं से भरत ने चलाया Ayodhya का राजपाट | Ram Mandir | Aaj Tak