हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कोणा एका व्यक्तीचे बाप नाहीत.ते समस्त शिवसैनिक यांचे बाप आहे.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्र पुरुष असल्याचे शासनाने जाहीर केले आहेत.शिवसैनिक यांच्या बापाला कोणी कमी लेखू नका. आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढतो अन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो काढून जनता जनार्दन यांच्या दरबारात जाण्याचे आवाहन बंदरे व खनिज मंत्री दादा भुसे यांनी अलिबाग तालुक्यातील राजमळा येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी आयोजित शिवसेना शिंदे गट जिल्हा कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत केले.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना शिंदे गटाच्या उप नेत्या शीतल म्हात्रे,आमदार भरत गोगावले,आमदार महेंद्र दळवी,आमदार महेंद्र ,उत्तर रायगडप्रमुख राजा केणी,दक्षिण जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत करंबे, यांच्यासाहित आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शिवसैनिक यांना मार्गदर्शन करताना भुसे यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शिवसैनिक यांना भेटत नव्हते आता प्रत्येकाला भेटत आहे.महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून काम करीत आहेत.त्या प्रकारचे काम आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्री यांनी केले नाही.

  

शिवसेना पक्षप्रमुख हे आपल्या भाषणात शिवसेना सोडून गेलेल्यानां गद्दार,,बाप पळविणारी टोळी,पाठीत खंजीर खुपसणारे म्हणून टीका करीत असतात.याला दादा भुसे यांनी चोख उत्तर देत समाचार घेतला.एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार सत्तेत आल्यांनतर महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी निर्णय घेतले. शिंदे आणि भाजप सरकार यांनी घेतलेले निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन उपस्थित शिवसैनिक यांना केले.5 ऑक्टोबर2022 रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले.आम्ही उठाव केला तेव्हा आम्ही घरातील भांडणे घरातच मिटावी यासाठी प्रयत्न करीत होतो.त्यावेळी उद्धव ठाकरे यांची मानसिकता ही आमदाराच्या बाजूने झुकत होती मात्र संजय राऊत आणि भास्कर जाधव त्यांना विचार बदलण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते.तीस महिने घरात बसून काहीही एक काम केले नाही.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रेरित असलेले जन हिताचे निर्णय घेण्यासाठी वारंवार मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना सांगत होतो.मात्र त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे खोडा घालण्याचे काम करीत असत आणि आम्हा शिवसैनिक यांना हीन वागणूक देत असत.अशीही टीका दादा भुसे यांनी यावेळी केली.

      यावेळी शीतल म्हात्रे यांनी सांगितले की,माझं मतपरिवर्तन अचानक झालेलं नाही. शिवसेनेत बंड झालं तेव्हा आम्हालाही धक्का बसला. सुरुवातीला आम्ही प्रचंड भावनिक झालो होतो. हे कसं झालं तेच कळत नव्हतं. त्यानंतर सर्व आमदारांची व मुख्यमंत्र्यांची भूमिका जेव्हा शांतपणे समजून घेतली तेव्हा आम्हाला कळलं की हे लोक बाळासाहेबांचीच भूमिका घेऊन जात आहेत. तेच प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. त्यांच्या प्रामाणिक भूमिकेला पाठिंबा देणं हे मी माझं कर्तव्य समजते, असं म्हात्रे म्हणाल्या.'मागील पाच वर्षांत मुंबई महापालिकेत शिवसेनेनं उत्तम काम केलं. मात्र, शिवसेनेच्या नगरसेविकांची गळचेपी होत होती. पक्षप्रमुखांना याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमची भूमिका साहेबांपर्यंत पोहोचू दिलेली नाही 

भरत गोगावले यांची मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. ते आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. सलग तीन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे आणि रायगडचे पालकमंत्रीपदही त्यांना देण्यात यावे, अशी आमची इच्छा असून ती मुख्यमंत्री नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

यावेळी आमदार भरत गोगावले यांनी सांगितले की,व्यथा आम्ही वेळीवेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे मांडली होती. मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांनी योग्यवेळी आमदारांच्या नाराजीची दखल घेतली असती तर ही परिस्थिती ओढावलीच नसती. आम्ही आजही शिवसेनेत आहोत. पक्षप्रमुखांनी पुन्हा सर्वाना बोलवले तर आम्ही त्यांच्याकडे नक्कीच जाऊ, पण आघाडीत मात्र जाणार नाही असे मत अलिबागचे शिवसेना शिंदे गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या, अशी विनंती पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. पण आमचे म्हणणे ऐकले गेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री दिला. त्यांच्याकडून शिवसेना आमदारांची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले गेले. विकास निधी दिला जात नव्हता.शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील मंजूर कामांचे श्रेयही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्री घेण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे सर्व आमदार आणि पदाधिकारी यांनी बैठक घेऊन पालकमंत्री हटावा म्हणून पुन्हा एकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. राज्यातील सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती होती. त्यामुळेच शिवसेना आमदारांवर उठाव करण्याची वेळ आली.

आम्ही कुठेही चुकलेलो नाही. गटबाजी होऊ नये, समेट व्हावा अशी आमची आजही प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे पक्षाच्या काही नेत्यांकडून आमदारांवर टिकाटिप्पणी होत असताना, घाणेरडे आरोप होत असताना एकाही आमदाराने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही संयम राखला आहे. मतदारसंघात अडीच वर्षांत जी कामे राहून गेली ती आता आम्ही करून दाखवू. जे नाराज आहे त्यांचीही समजूत काढू.असेही गोगावले यांनी सांगितले.