आष्टी (प्रतिनिधी)
गेल्या कित्येक दशकापासून बीड जिल्ह्यातील जनता नगर- बीड- परळी या रेल्वे सेवेच्या प्रतीक्षेत होती.स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी या बीड जिल्ह्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अथक परिश्रम केल्यामुळे हा सोनेरी दिवस उगवणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे यासाठी आपण मोठ्या संख्येने चिंचाळा येथील रेल्वे स्टेशन वर उपस्थित राहावे असे आवाहन चिंचाळा गावचे सरपंच अशोक पोकळे यांनी केले आहे.
आज २३ सप्टेंबर रोजी सकाळी११.०० वा आष्टी ते अहमदनगर या रेल्वे सेवेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, माजी मंत्री ज्येष्ठ नेत्या.आदरणीय पंकजाताईसाहेब मुंडे, खा.डॉ. प्रीतमताई मु़ंडे या मान्यवरांच्या उपस्थितीत आमच्या चिंचाळा गावात शुभारंभ होत आहे.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चिंचाळा गावचे सरपंच अशोक पोकळे केले आहे.
 
  
  
  
   
   
   
  