शिरुर: मागील आठवड्यात भाजपाच्या केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह शिरुर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असताना शिक्रापुरमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधताना शिरुर तालुक्यातील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने एका पत्रकाराला प्रश्न विचारु न देता त्या पत्रकाराला धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली असुन याबाबत पुणे जिल्ह्यातील पत्रकारांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.
भाजपाच्या केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह शिरुर लोकसभेच्या दौऱ्यावर असताना विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे कार्यक्रमाला अनेक ठिकाणी विलंब देखील झाला.अशातच प्रत्येक ठिकाणी तासनतास पत्रकार केंद्रीय मंत्र्यांची बातमी कव्हर करण्यासाठी थांबून राहत होते. शिक्रापुर मधील कार्यक्रमालासुद्धा केंद्रीय मंत्री नियोजित वेळेपेक्षा उशिरा आल्या. तरीही काही पत्रकार तिथे थांबून होते त्यावेळी केंद्रीय मंत्री पत्रकारांशी संवाद साधत असताना शिरुर तालुक्यातील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने काही प्रश्न विचारल्यानंतर तालुक्यातील विविध प्रश्नांवर संबंधित पत्रकारांना प्रश्न विचारण्यास थांबवत संबंधित पत्रकाराला बाजुला सारत , धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यातील पत्रकार बांधवांकडुन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत संबधित भाजपाच्या पदाधिकाऱ्याशी संवाद साधला असता. असा कोणताच प्रकार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु सदर घटनेचा व्हिडिओ उपलब्ध असुनही हे महाशय केलेली चुक नाकारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच हे महाशय स्वतः वकील असल्याने अनेकवेळा एखाद्या बातमीसाठी पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया विचारल्यास पत्रकारांसुद्धा ते कायद्याचा बडगा दाखविण्याची भाषा वापरत असतात.