पोखरनी गावात व्यक्ती हा सुधाकर जाधव म्हणजे ग्रामीण भागातील एक उदयोन्मुख नेतृत्व म्हणावेच लागेल ....गावातील बिनविरोध सरपंच झाल्यानंतर गावातील अनेक समस्या कडे त्यांनी आव्हान म्हणून पाहिलं आणि एक एक समस्या सोडवत गेले ..... गावात अंधाराचे साम्राज्य होते त्यांनी प्रथमतः पाठपुरावा करून दोन सिंगल फेज डीपी बसवल्या , जिल्हा परिषदेच्या शाळेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हते त्यांनी स्वतः खर्च करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना करून दिली, गावातील रस्ते नाले यांची सुधारणा करत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या, मध्यंतरी एक ऐतिहासिक चित्रपट निघाला होता ..... "तान्हाजी"........! गावातील जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यासाठी त्यांनी गावातून तीन ते चार क्रूजर केल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना घेऊन परभणी येथे चित्रपट ग्रहात स्वखर्चाने सर्वांना तान्हाजी हा ऐतिहासिक चित्रपट दाखवला..... त्यामधून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती तर मिळाली शिवाय प्रेरणा निश्चितपणे मिळालीच असेल....!
गावातील गरजूंना ज्यावेळी कोणतीही मदत लागते त्या वेळी ती सर्व मदत करण्याची तयारी सुधाकर जाधव नेहमी ठेवतात....लॉकडाऊन च्या काळात साधारणतः 300 कुटुंबाना अन्न धान्य किट त्यांनी स्वखर्चाने वाटप केल्या.... अनेक वेळा गरीब लोकांना सर्वार्थाने त्यांनी मदत सुद्धा केलेली आहे तसेच गावात कोणाचाही तंटा झाला त्यामध्ये कोणाचीही बाजू न घेता जे योग्य असेल ते सांगण्याची पूर्ण कामगिरी सुधाकर जाधव यांनी अनेकवेळा लीलया पार केलेली आहे.... ग्रामपंचायतीला वित्त आयोगातून येणारा पैसा हा लोकोपयोगी कामासाठी खर्च केला आहे... पोखरणी या संपूर्ण गावात एलईडी लाईट लावून लक्ख केले... याशिवाय सर्व महापुरुषांचा आदर राखून सर्व महापुरुषांच्या जयंत्या देखील अतिशय उत्साहात मध्ये त्यांनी साजरा करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे...
नेहमी हसतमुखाने सर्वांचे स्वागत करणारे , हजरजबाबी आणि कुणालाही आला राग तर येऊदे असे म्हणत खरं , फटकळ बोलणारे आपले सुधाकरराव......
राजकीय जीवनात सुधाकरराव कुठेही असो त्यांनी ग्रामपंचायत पोखरणी वर स्वतःचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.....असेच यश त्यांना मिळत राहो...! शिवाय आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूकित बंजारा समाजातर्फे त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे...त्यातही ते यश मिळवतील... त्या करिता देखील मनस्वी शुभेच्छा...!
चांगले मित्र सुधाकरराव जाधव यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो... उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो हीच त्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा.......वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा