औरंगाबाद:- (दीपक परेराव) औरंगाबाद मधील राष्ट्रवादी माजी जिल्हाअध्यक्ष विजयराव साळवे ,संघर्ष सोनवणे, विक्की चावरीया व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार उदयसिंह राजपूत, उपजिल्हाप्रमुख जिल्हा परिषद सभापती अविनाश पाटील गलांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आज शिवसेनेत पक्षप्रवेश घेतलेल्या राष्ट्रवादी माजी जिल्हाअध्यक्ष विजयराव साळवे , संघर्ष सोनवणे, विक्की चावरीया व कार्यकर्त्यांनी
औरंगाबाद पश्चिम व वैजापूर मधील सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. निवडणुका केव्हाही जाहीर होतील. पुढच्या निवडणुकीत शिवरायांचा भगवा फडकावयाचा आहे, त्यामुळे शिवसेना बळकटीकरणासाठी कामाला लागा असे मार्गदर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन कार्यकर्त्यांना केले.
वैजापूरमधील जितेंद्र पाटील जगदाळे,सरपंच जानेफळ, विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष
कैलास सुरेश जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वालफ कुहिले, जानेफळ गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष जगन पाटील जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य करजगाव तान्हाजी पाटील उगले, सरपंच पेडेफळ
सोपान पाटील आहेर, सुनील पाटील मतसगर जानेफळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.