आष्टी (प्रतिनिधी) तालुक्यातील गहुखेल म्हसोबाची वाडी येथील चौकास डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन पाटीचे उदघाटन करण्यात आले.आज सकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जि.प.सदस्य सुरेश बापु माळी होते , व उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महादेव डोके , राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हरीभाऊ दहातोडे,
शिवदास भाऊ शेकडे ग्रामपंचायत सदस्य,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तालुका अध्यक्ष दिपक भैया गरुड ,वंचित बहुजन आघाडीचे दत्तात्रय भास्कर खंडागळे, तसेच कुष्णा गायकवाड़,दिपक गायकवाड़,नवनाथ गायकवाड़,भारत गायकवाड़,अक्षय गायकवाड़,बाळु गायकवाड़,दिलीप वाघमारे,अक्षय साळवे,प्रदीप साबळे,नवनाथ शेकडे, आदी मान्यवर उपस्थित होते.