जिल्हा परिषद शाळेला गावकर्‍यांनी ठोकले कुलूप

"औरंगाबाद तालुक्यातिल घारेगाव येथील प्रकार;शाळेतील शिक्षक मारतात शाळेला दांडी"

पाचोड(विजय चिडे) घारेगाव ता.औरंगाबाद येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्यध्यापकासह शिक्षक सतत दांडी मारत असुन शाळेत उशीरापर्यत येत असल्यामुळे गावकर्‍यांनी (दि.२२)शाळेत जाऊन पाहणी केली असता तिथे शाळेतील काही शिक्षकांनी शाळेला दांडी मारल्याचा धक्कादायक प्रकार सकाळीच्या दरम्यान उघडकीस आला.यामुळे घारेगाव ता.औरंगाबाद या परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये एकच खळबळ उडाली.

जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांना प्रशासन भरभक्कम पगार मिळतो हा पगार गोरगरीब शेतकर्‍यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी दिला जातो मात्र जि.प.चे अनेक शिक्षक शाळेत येत नाही तसेच काही लेटलतिफ शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. घारेगाव ता.औरंगाबाद येथील जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षक कधीच वेळेत शाळेच्या वेळेमध्ये येत नसल्याचे दिसुन येत होते. या पूर्वी त्या शिक्षकास वेळोवेळी सांगूनही त्यांच्यावर काहीच फरक पडला नाही. शासनाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून चांगल्या शिक्षकांची नियुक्ती करतात.

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक गैरहजर असतात असे चित्र दिसून येते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण बुडत आहे. याबाबतीत शाळेची वारंवार तक्रार करूनही वरिष्ठ गोष्टीकडे लक्ष देले नाही अगोदर शिक्षकांना समजूत घालण्यात आले होते.परंतु तरीदेखील शिक्षक शाळेला दांड्या मारत आहे. त्यामुळे आज 

सरपंच विक्रम कतारे, उपसरपंच श्रीराम तांबे, अनिल काजळे, ग्रा.प.स.विजय लहाने, शालेय समिती अध्यक्ष बळीराम लहाने, गणेश डायगव्हाणे, गणेश लहाने, सोमनाथ गव्हाणे,राजू ठोबरे, मदन गव्हाणे, रामेश्वर कतारे, संजय गलधर, विश्वास दाभाडे, शिवाजी कतारे यांनी 

शाळेत जाऊन शाळेला कुलूप ठोकण्यात आल्यामुळे दांडीबहाद्दर शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली असून जोपर्यंत गैरहजर असणाऱ्या शिक्षक सतत शाळेत येत नाही तो पर्यंत विद्यार्थीना शाळेत पाठविणार नाही अशा पालकांनी दिला आहे.

चौकट-प्रभारी केंद्रप्रमुखास घेरावा.

शाळेला गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकली असल्यामुळे प्रभारी केंद्रप्रमुखास शेख मोहंमद रियाज यांनी भेटली असतानाच त्यांना गावकऱ्यांनी घेराव घातला त्यावेळी त्यांनी पालकांची समजूत काढण्याचा पर्यंत केला.परंतु गावकरी ऐकण्यास तयार नसल्यामुळे प्रभारी केंद्रप्रमुखांनी तेथून काढता पाय घेतला आहे.