बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील नागरिकांना दिलेल्या विकास कामांच्या वचनांची पूर्तता करण्यासाठी गेल्या 35 वर्षापासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी प्रयत्न केलेले आहेत, शहरातील 88 कोटींची 16 डीपी रस्त्यांची कामे झाल्यानंतर आता नवीन 15 रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असून यासाठी एकूण 90 कोटी रुपये मंजूर झाले आहेत,या कामाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती युवा नेते योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे

बीड शहरात विविध विकास कामे करत असताना शहराच्या वाढीव हद्दी मधील रस्ते करण्याची मागणी करण्यात येऊ लागली त्यामुळे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी नवीन 15 डीपी रस्त्यांचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाखल केला होता 2018 साली दाखल झालेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून यासाठी 69 कोटी रुपये मंजूर झाले आहेत,तसेच यासाठी लागणारे अतिरिक्त 20 कोटी असे एकूण 90 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जानेवारी 2022 मध्ये ही मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले सातत्याने केलेला पाठपुरावा पत्रव्यवहार मंत्र्यांच्या भेटीगाठी यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे,

सध्या पावसाळा आणि सणासुदीचे दिवस लक्षात घेता जनता आणि व्यापारी वर्ग यांना त्रास होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने ही कामे हाती घेतले जाणार आहेत, लवकरच उद्घाटनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे आपण ही कामे स्वतः उपस्थित राहून पूर्ण करून घेणार असून रस्त्याच्या कामाचा दर्जा याकडे लक्ष देणार असल्याचे डॉ योगेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे सध्या आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्या आमदार महोदयांनी घाई गडबड करून फुकटचे श्रेय घेण्यासाठी कामाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न करू नये असाही टोमणा त्यांनी शेवटी मारला आहे