जिल्हा परिषद प्राशालेत विद्यावेध 2020 अंतर्गत इयत्ता पहिली व दुसरीच्या शिक्षक व केंद्रप्रमुखाचे प्रशिक्षण
औंढा नागनाथः- जिल्हा परिषद प्राशाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या शिक्षकाचे व केंद्रप्रमुखाचे आणि तालुक्यातील साधने व्यक्तीचे विद्यावेध 2020 कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण दोन टप्प्यांमध्ये सुरू आहे.QUEST ,महाराष्ट्र शासन आणि Edelgive Foundation यांच्या साहाय्याने हिंगोली जिल्ह्यात चालू असलेल्या The Collaborators Transforming Education या प्रकल्पातर्गत औंढा तालुक्यातील उंडेगाव आणि येहळेगाव या दोन केंद्रातील इयत्ता पहिली आणि दुसरीचे शिक्षक तसेच या केंद्रातील केंद्रप्रमुख यांचे तिसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण चालू आहे. हे प्रशिक्षण मुखत्वेकरून भाषा आणि गणित या दोन विषयांवर आधारित आहे. या प्रशिक्षणात भाषेत- सहभागी वाचन आणि प्रकट वाचन, गोष्टीचे लेखन आणि गणितात- संख्याज्ञान, संख्या रेषेवर बेरीज आणि वजाबाकी, व्यवहार इत्यादी घटकांवर होणार आहे हे प्रशिक्षण दिनांक 21 आणि 22 सप्टेंबर 2022 या दोन दिवसात औंढा येथील प्रशाळा औंढा येथे आयोजित करण्यात आले आहे. सौ.मीना निमकर या प्रशिक्षक म्हणून लाभल्या आहेत. हिंगोली CTE प्रकल्पाचे काम पाहणारे प्रकल्प अधिकारी योगेश राऊत ,औंढा तालुक्याचे काम पाहणारे समन्वयक हर्षल काठोले तसेच QUEST मध्ये felloship साठी आलेले नरेंद्र बन्सोड सुद्धा या प्रशिक्षणाला हजर होते.या प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषद प्रा शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी मोरे यांनी विद्यावेध 2020 या कार्यक्रमास शाळेमधून हॉल उपलब्ध करून दिला तसेच शिक्षकांना पिण्याच्या पाण्याच्या सोय करून दिली.