शिक्षण क्षेञात आष्टी शहरासह तालुक्यात शेतकरी शिक्षण संस्था ही अग्रस्थानी आहे.या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शहरासह तालुक्यात विविध अभ्यासक्रमाचे महाविद्यालय,माध्यमिक विद्यालयात,शाळा आहेत.या संस्थेच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयात चालवले जाते.या विद्यालयाने आपला शैक्षणिक दर्जा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून ती टिकून ठेवली आहे.या विद्यालयात सर्वसमावेशक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.पालक मेळावा प्रसंगी दि.१७सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठीचे शिक्षक श्री.कल्याण वाल्हेकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबर संस्कारही महत्त्वाचे आहेत आणि हे करण्याची जबाबदारी शिक्षका इतकीच पालकांचीही आहे.अशा अनेक विषयांवर ते बोलताना पालक अंतर्मुख झाले.
यावेळी पालकांनी अनेक विषयी शिक्षकांशी चर्चा केली.विद्यार्थांची गुणवत्ता विषयी शिक्षकांबरोबर पालकांनी देखील दक्ष राहिली पाहिजे.विद्यार्थांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांबरोबर पालकांनी देखील सतर्क राहीले पाहिजे.शिक्षकांमध्ये संवाद साधला गेला,पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आष्टी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निमित्त पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्या प्रसंगी पालक मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री. सुरेशजी बोडखे सर प्रमुख पाहुणे म्हणून इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक वर्ग,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ससाणे सर,श्री काळे सर यांनी पाहिले,प्रास्ताविक श्री.वाल्हेकर सर यांनी केले,अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पालक शिक्षकांमध्ये संवाद साधला गेला,घटक चाचणी त प्रत्येक विषयाचे गुण व ग्रहपाठाच्या वह्या या विषयी चर्चा झाली,प्रोजेक्टर वर अभ्यासक्रमाची ध्वनीफीत पाहिल्यानंतर अतिशय आनंदी वातावरण तयार झाले.या मेळाव्यात पालकांमधून पिंपरीचे सरपंच महादेव कोंडे,डॉ.नदिम शेख,पत्रकार अण्णासाहेब साबळे,पत्रकार संतोष सानप ग्रामसेविका सदाफुले मँडम,डॉ.शेख मँडम,लटपटे सर, अशोक शेळके,सौ.आंधळे,भा.द.जगताप, सदाशिव दिंडे,सौ.तुपसुंदर,सौ.मांडकर,सौ.जोशी,अमृत आजबे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी पुढील पालक मेळावा विद्यार्थी, शिक्षक,पालक सह एकत्र घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री सुरेश बोडखे सर,यांनीही आपले मनोगत मधून मान्यता दिली.या कार्यक्रमासाठी देडे,बोराडे, जगताप,डोके,काळे,सातव, ससाणे,इरले,मोठे,चौरे,निकाळजे,गायकवाड,शिंदे,सरोदे,झगडे,सिरसाठ,धोंडे,श्रीमती फुले,श्रीमती मेहेर,श्रीमती बोरूडे,श्रीमती ताम्हणे,श्रीमती वनवे,श्रीमती ससाणे,श्रीमती हजारे,सय्यद,होळकर,इनामदार,लाड या शिक्षकांनी यांनी परिश्रम घेतले.शेवटी पालकांना चहा नाष्टा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.