रायमोहा/ प्रतिनिधी : शिरुर तालुक्यात श्री क्षेत्र मत्यसेंद्रगडचे ब्रम्हलिन गुरूवर्य स्वामी निगमानंदजी महाराज यांची तृतीय पुण्यतिथी कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री क्षेत्र मत्यसेंद्रगड संस्थानचे मठाधिपती ह.भ. प. स्वामी जनार्दन महाराज गुरू निगमानंदजी महाराज यांनी दिली.

पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवार दि. ३० सप्टेंबर रोजी ह. भ. प.महंत बाबा गीरीजी महाराज, श्री क्षेत्र काशीकेदारेश्वर संस्थान नागलवाडी, यांचे कीर्तन रात्री ७ ते ९ वा. या वेळेत होईल. या नंतर शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ८ वा. विष्णुसहस्त्रनाम व, गितापाठ‌ होईल व नंतर सकाळी ८ ते ९ वा. ब्रम्हवृंदांच्या मंत्रघोषाने समाधी अभिषेक होईल. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ वा. या वेळेत ह. भ.प. रामायणाचार्य महंत भागवत महाराज यांचे हरि कीर्तन होईल. या नंतर पंचक्रोशीतील भाविक भक्त यांच्या वतीने महाप्रसाद दिला जाईल, तसेच श्री क्षेत्र मत्यसेंद्रगड येथे बसने येण्यासाठी पाथर्डी ते श्री क्षेत्र संस्थान मत्यसेंद्रगड सायं ६ वा. व पाथर्डी येथून बीड ते श्री क्षेत्र संस्थान मत्यसेंद्रगड सायंकाळी ६ वा. बीड येथून बस सुविधा उपलब्ध आहे. तरी भाविक भक्तांनी ब्रम्हलिन गुरूवर्य स्वामी निगमानंदजी महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थितीत राहावे, असे आवाहन स्वामी जनार्दन महाराज गुरू निगमानंदजी महाराज यांनी केले.