आष्टी (प्रतिनिधी) रेल्वे स्थानकास चिंचाळा आष्टी असे नाव दयावे तसेच चिंचाळा गावाचा रेल्वे प्रशासनाकडून अपमान होवून निमंत्रण पत्रिकेत चिंचाळा येथील लोकप्रतिनिधींचा सन्मानाने नामोल्लेख ही केलेला नाही तो करण्यात यावा अशी मागणी समस्थ ग्रामस्थ चिंचाळा यांनी आष्टी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.निवेदणात पुढे असे म्हटले आहे की चिंचाळा गावातील सुमारे १८५ एकर जमीन रेल्वेने संपादीत केलेल्या असुन दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वा रेल्वेच्या अहमदनगर - आष्टी या डेमु रेल्वेच्या आगमनाचा कार्यक्रम होत आहे. सदर निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध होताना रेल्वे प्रशासनाने मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री मा.राज्य रेल्वेमंत्री व ईतर यांच्या नावाचा उल्लेख आदराने केलेला असुन आमच्या गावातील जमीन संपादीत होवून सुद्धा आमच्या गावातील प्रतिष्ठीत लोकप्रतिनिधींचा नावाचा नामोल्लेख केलेला नसुन हे आमच्यासाठी निंदणिय बाब आहे.तसेच आमच्या परीसरातील जमीनी संपादीत केल्याअसुन आष्टी येथील रेल्वे स्थानकास न्यु आष्टी ये नाव दिलेले आहे. सदर नावाचा संपादीत जमीनी गावाशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही. त्यामुळे सदर रेल्वे स्थानकास चिंचाळा आष्टी असे नाव दयावे अशी मागणी चिंचाळा ग्रामस्थ यांनी आष्टी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे