पाथरी:-तालुक्यातुन जायकवाडीचा डावा कालवा जात असुन या कालव्या लगत लाखो ब्रास मुरुम असुन या मुरुमाची रात्री बेरात्री उत्खनन व वाहतूक करण्यात येत असल्याने कालव्याच्या बाजु आत्ता ढासळताना दीसु लागल्या आहेत.त्यामुळे कालव्याला मोठ-मोठे भगदाड पडले आहेत.
सविस्तर वृत्त असे की,पाथरी तालुक्यातुन जायकवाडीचा डावा कालवा जात असुन या कालव्याचे काम चालु असताना जायकवाडी विभागाने कालव्याच्या अख्त्यारीत येणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देवुन जमीनी ताब्यात घेवुन कालव्याचे खोदकाम सुरू करुन मधे निघणारा मुरुम कालव्याच्या दोन्हीही बाजुला टाकला जेने करुन या कालव्याचे संरक्षण होईल.परंतु मागिल काही वर्षापासुन महसुल विभागाचे कर्मचारी व जायकवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने या ठीकाणी मोठ्या प्रमाणात पोकलेन च्या,जेसिबीच्या,मोठ-मोठ्या हायवाच्या सहाय्याने मुरुमाचे उत्खनन व वाहतूक चोरट्या मार्गाने केली जात असल्याने आत्ता जायकवाडीच्या डाव्या कालवा ढासळु लागल्याने कालव्याला मोठ-मोठे भगदाड पडले असुन या प्रकाराकडे वरिष्ठांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.अन्यथा जायकवाडीच्या डाव्या कालव्याची मोठी हाणी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.