हादगांव बु येथे गावातील व परिसरातील पशुपालकांनी आणले होते पशुधन.

कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती अनिलराव नखाते यांनी स्वखर्चातून उपलब्ध करू दिला लस पुरवठा.

पाथरी (वार्ताहर) जनावरांसाठी लंपी हा संसर्ग रोग अतिशय हाणीकारक आहे. त्या रोगाची लागण हादगांव बु आणि परिसरातील जनावरांना होऊ नये यासाठी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी स्वखर्चातून लंपी प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. सोमवारी १९ सप्टेंबर रोजी हादगांव बु येथे गावातील व परिसरातील जनावरांना पशुवैद्यकीय कर्मचाऱ्याकडून हि लस देण्यात आली.

           हे लसिकरण पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ हादगांव बु येथे करण्यात आले.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे यांचे हस्ते या लसिकरण मोहीमेचे उद् घाटन करण्यात आले.यावेळी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलभाऊ नखाते,प्रभाकर शिंदे, सरपंच बिभीषण नखाते, चेअरमन बाबासाहेब नखाते, रमेशराव नखाते,,लक्ष्मण नखाते,बी.टी. कदम,बाबासाहेब शिंदे,शिवाजी कुटे,सतीश नखाते,कैलास नखाते,रामदास शिंदे, देविदास शिंदे,विठ्ठल कवचट, पाशा पठाण,शेख जाकेर, युनूस पठाण,पांडुरंग हारकळ, अर्जुन नखाते यांची उपस्थिती होती.

         हादगांव बु व परिसरातील पशुपालकांनी आणलेल्या सर्व जनावरांना नियोजनबद्ध पध्दतीने हे प्रतिबंधक लसिकरण करण्यात आले. या लसिकरणाठी पाथरी चे सहा.आयुक्त डॉ.जवाद अहमद खान,पशुधन विस्तार अधिकारी डॉ.गिरीश लाठकर,पशुधन पर्यवेक्षक श्रीमती विभा नाखले,परमेश्वर जाधव,पांडुरंग हरकळ, सवने,पिसाळ,करण कांबळे यांचे सहकार्याने हे लसीकरण झाले.

              सामाजिक दायीत्वातून जनावरांना लंपीरोग होऊ नये यासाठी स्वखर्चाने प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिल्या बद्दल पशुपालकांच्या वतीने अनिलराव नखाते यांचा सत्कार करण्यात आला.