हर्षवर्धन जाधवांवर अॅट्रॉसिटी गुन्हा कायम , याचिका मागे टपरी लावण्यावरून झालेल्या वादाचे पडसाद खंडपीठापर्यंत औरंगाबाद : आपल्यावरील अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करा , या मागणीसाठी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती . पण आपला युक्तिवाद खंडपीठाला पटेल असे कारण जाधव देऊ शकले नव्हते . त्यामुळे त्यांची याचिका फेटाळण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले . ही नामुष्की नको म्हणून अखेर जाधव यांनीच याचिका माघारी घेण्याची परवानगी मागितली , ती न्यायालयाने दिली आहे . नितीन दाभाडे यांचे आणि जाधव यांचे टपरी लावण्यावरून भांडण झाले होते . या वादात जाधव यांनी आपणास जातिवाचक शिवीगाळ केली , असा आरोप दाभाडे यांनी केला होता . त्यांच्या फिर्यादीवरून जाधव यांच्याविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला होता . जिल्हा व सत्र न्यायालयाने हा गुन्हा रद्द करण्यास नकार दिल्यानंतर जाधव यांनी खंडपीठात धाव घेतली होती . अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करा , सत्र न्यायालयातील दोषारोपपत्रही रद्द करावे , अशी विनंती त्यांनी याचिकेत केली होती . या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत . तसेच गुन्हा रद्द करण्यासाठी जाधव यांच्याकडून योग्य कारणमीमांसा करण्यात आली नाही