प्रत्येकांनी संताप्रमाणेच आई वडिलांची सेवा केली पाहिजे 

हभप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांचे प्रतिपादन

   प्रत्येकाने धर्माचे रक्षण केले पाहिजे. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसे देई प्रेम काही कळा, हे सोंग सारीले या रुपे आनंते, पुढेही बहुते करणे आहे, तुका म्हणे धर्म संस्थापणे, केला नारायणे अवतार असे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात संताचे महत्व, त्यांचे कार्य, धर्माचे रक्षण, नित्य ,कार्य केले पाहिजे, असे सांगून आई वडिलांची सेवाही केली पाहिजे, असे प्रतिपादन वा.शि.संस्थान पंढरपुर हभप ज्ञानेश्वर( माऊली)जोगदंड महाराज यांनी केले.

येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थान या ठीकाणी ज्ञानेश्वरी जंयती व माता पिता पुण्यतिथी वै.सद्गुगुरु विठ्ठल महाराज घुले यांच्या पुण्यतिथी निमित्त दि.२१ मंगळवार रोजी काल्याच्या कीर्तनामध्ये हभप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड हे बोलत होते. पुढे कीर्तनात ते म्हणाले की, ज्या ज्या वेळी धर्मावर संकट येतील, त्या त्यावेळी भगवंताने अवतार घेऊन ते संकट निवारण केले. धर्माचा प्रसार, प्रचार, प्रबोधन, मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक संत अखंड कार्य करीत असतात असे प्रतिपादन केले आहे.

या कीर्तन सोहळ्यास हभप नामदेव महाराज ढवळे, पांडुरंग महाराज शितोळे, विष्णू महाराज देशमुख, परमेश्वर कोरडे महाराज दौलताबाद, मृदंग सम्राट विठ्ठल कावळे,अप्पा गायके, बंडू महाराज पवार, महाराज नागनाथ कुडाळेकर, सोपान चव्हाण महाराज, राम तिडके, मोहन हाततिडके, रामेश्वर पवार,शास्त्री दत्ता महाराज गिरगावकर ,सातपुते ,रमेश मोरे महाराज ,पंजाब काळे,हभप महादेव ढवळे महाराज,भागवताचार्य हभप दशरथ महाराज अंभोरे, सचिन लंबे यांच्यासह भगवानराव राऊत, नानासाहेब राऊत, सरपंच अनिरुद्ध चव्हाण ,इंद्रजीत घाटुळ, प्रतापभैय्या देशमुख,हनुमान भंडारे,भगवानराव सोनटक्के,सदाशिवराव देशमुख, ज्ञानेश्वर आघाव,यांच्यासह पंचक्रोशितील भजणी मंडळी,भाविक भक्तासह अनेक शिष्य वर्ग, आजी,माजी विद्यार्थ्यांसह गावातील भाविकांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत