पाथरी (प्रतिनिधी) ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असल्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णांना व ईत्तर रुग्णांना रुग्णालयात असलेल्या परीचारीका (सिस्टरच)वैद्यकीय अधिकारी यांना फोनवर बोलुन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावाने पत्र देवुन परभणीला पाठवत असुन रुग्णांच्या जिवितासी खेळल्या जात असल्याची व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खाजगी दवाखाने थाटले असल्याची तक्रार वंचीत बहुजन आघाडीचे लींबाजी ढवळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,पाथरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेत हजर नसल्याने रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णांना रुग्णालयात असलेल्या परीचारीका योग्य तपासणी न करताच तुमच्या रुग्णाला पाणी कमी आहे,रक्त कमी आहे कींवा बाळाचे ठोके कमी आहेत अशी कारणे दाखवत प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णांना परीचारीकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांला फोनवर बोलुन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावाने पत्र देवुन परभणीला पाठवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.व त्याच बरोबर ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.एस.जाधव, डॉ.एस.एन.धबाले, डॉ.कविता घनवट यांनी खाजगी दवाखाने थाटले असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे लींबाजी ढवळे यांनी उपविभागीय अधिकारी पाथरी, तहसिलदार पाथरी, गटविकास अधिकारी पाथरी याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.