सिल्लोड : तालुक्यातील पळशी येथील जोगेश्वरी हायस्कुल येथून एका १० ते १२ वर्षीय मुलाचे एका कार चालकाने अपहरण केल्याची अफवा संपूर्ण सिल्लोड तालुक्यात पसरलेली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस पळशी येथे दाखल होऊन त्या दृष्टीने तपास करत होता. दरम्यान, नेमके कोणत्या शाळेतील विद्यार्थ्याचे अपहरण झाले? अपहरण झाले की ही अफवा आहे याची खात्री करण्यासाठी पोलिसांसह, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ सर्व दिशेने तपास करत असताना पोलिसांनी तसेच गावकऱ्यांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये काही निष्पन्न झाले नाही.शाळेची हजेरी तपासली असता सर्व विध्यार्थी हजर असल्याने दिसून आले. व गैरहजर विध्यार्थीच्या घरी फोन केले असता मुले घरी असल्याने निष्पन्न झाले आहे. वाड्या वस्त्यावरील शाळेच्या विध्यार्थ्यांनाची तपासणी केली असता सर्वच मुले हजर असल्याचे शिक्षकांनी सांगितले.सविस्तर माहिती अशी की, सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास एका खाजगी शाळेत जाणाऱ्या ५ मुलांनी सांगितल्यानुसार पळशी गावापासून जवळ असलेल्या एका खाजगी शाळेजवळ चॉकलेटचे आमिष दाखवून चालकाने एका मुलास बोलावले. त्यानंतर त्याच्या तोंडाला कपडा बांधत ओढत कारमध्ये बसवले. त्यावेळी कारमध्ये एक महिला व दोन पुरुष होते. मुलांनी तत्काळ याची माहिती शाळेत येऊन शिक्षकांना दिली. बघता-बघता ही वार्ता संपूर्ण गावात पसरली.परंतु या घटनेचा अद्यापपर्यंत कुणाच्याही हाती ठोस पुरवा लागला नाही, त्याकरीता यापुढे खातरजमा केल्याशिवाय कोणीही या घटने विषयी अफवा पसरवून प्रशासणाची दिशाभूल करू नये

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं