जितेंद्र जाधव
इंदापूर/प्रतिनिधी :-
दि. १७ सप्टेंबर रोजी कळस जवळील नेचर डिलाईट डेअरी जवळ गणेश शेलार रा.पळसदेव (माळेवाडी) यांच्या जवळ असलेल्या ३६ लाख ३२ हजार रुपये रोख रकमेवर दिवसाढवळ्या दरोडा टाकून गाडीतील रक्कम लोखंडी राॅड ने गाडीची काच फोडून लुटून नेल्याची तक्रार वालचंदनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
गणेश शेलार हे लोणी देवकर एमआयडीसी मध्ये असलेल्या वाय ॲक्सिस स्ट्रक्चरल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सुपरवायझर या पदावरती कार्यरत आहेत ते बारामती व जंक्शन येथील व्यापाऱ्यांकडून उधारीची ३६ लाख ३२ हजाराची रक्कम घेऊन आपल्या सहकाऱ्यांसह चार चाकी कार गाडी मधून डाळच मार्गे कंपनीकडे निघाले होते.
त्यावेळी कळस जवळ असलेल्या नेचर डिलाईट डेअरी जवळ अनोळख्या सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारने ओव्हरटेक करून शेलार यांची गाडी अडवली. त्या मधील एका दरोडेखोराने लोखंडी राॅडने शेलार यांच्या गाडीची काच पाठी मागील दरवाज्याच्या बाजूने फोडून गाडीत असलेली पैशाची बॅग उचलून शेलार यांच्या गाडीची चावी काढण्यात दरोडेखोर यशस्वी ठरले.
काही क्षणात दरोडेखोर यांनी आलेल्या स्विफ्ट कार गाडी मधून त्या ठिकाणाहून डाळज कडे पळून जाण्यात यशस्वी झाले असून सदर प्रकरणाची तक्रार वालचंदनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. संबंधित प्रकरणाचा तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत.