शिरुर: शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी येथील रहिवाशी आणि पुणे जिल्हा परीषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे तसेच राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कडी -कोयंडे उचकटून चोरटयांनी चोरी केली असुन प्रभाकर गावडे यांच्या घरातून लोखंडी कपाट उचकटून 5 तोळे वजनाचे 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 15 हजार असे एकुण 2 लाख 65 हजार रुपयांची घरफोडी करून चोरट्यांनी दागिन्यांसहीत रोख रक्कम चोरून नेली आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवार (दि 19) रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास प्रभाकर गावडे आणि त्याचा मुलगा वेदांत रात्रीचं जेवण करुन टाकळी हाजी गावातील घर बंद करुन झोपण्यासाठी शेतातील दुसऱ्या घरी गेले होते. त्यांनंतर आज मंगळवार (दि 20) रोजी सकाळी 6:30 च्या सुमारास शेजारी राहणाऱ्या सुप्रिया अमोल गावडे हिने फोनवरून प्रभाकर गावडे यांना तुमचे घर उघडे दिसत असुन कोणीतरी दरवाजाचा कोंडा तोडलेला दिसत आहे असे सांगितले. त्यामुळे प्रभाकर गावडे हे तातडीने घरी गेले. त्यावेळी घराचा कडी-कोंयडा तुटुन कोंडयांसहीत कुलुप खाली पडलेले दिसले. त्यावेळी लोक जमा झाल्यानंतर घराची पाहणी केली असता घरातील बेडरुममध्ये असलेले लोखंडी कपाट उघडे होते. तेव्हा कपाटाची पाहणी केली असता लोंखडी कपाटाचे लॉकर उचकटुन त्यातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनतर आजूबाजूच्या घराची पाहणी केली असता प्रभाकर गावडे यांचे चुलत भाऊ महादेव श्रीपती गावडे यांच्या पण घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यावेळी त्यांना फोन करून घरात चोरी झाल्याबाबत माहीती दिली. तसेच त्यांच्या घरात जावुन पाहणी केली असता त्यांच्या घरात उचकपाचक करुन कपडे खाली पडलेले दिसले. महादेव श्रीपती गावडे यांच्या घरातील दोन टेबल फॅन प्रभाकर गावडे यांच्या घरात चोरटयाने ठेवलेले दिसले. तेव्हा प्रभाकर गावडे व महादेव गावडे या दोघांच्या घरात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने घूसून घरातील
एकूण 5 तोळे वजनाचे 2 लाख 50 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच 15 हजार रोख असे एकुण 2 लाख 65 हजार रुपयांची घरफोडी करुन चोरी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रभाकर गावडे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस शिपाई विशाल पालवे, पोलिस हवालदार अनिल आगलावे यांनी भेट दिली असुन शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
टाकळी हाजीमध्ये माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावर बंद घर हेरुन सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी आधिकारी प्रभाकर गावडे आणि सेवानिवृत्त पोलिस उपविभागीय आधिकारी महादेव गावडे यांच्या घरावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. बेट भागात अनेक दिवसापासून चोऱ्यांचे सत्र सुरु असून आता अधिकाऱ्यांच्या बंद घराकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला आहे.त्यामुळे पोलिस आधिकाऱ्यांचीच घरे सुरक्षित राहिली नसुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.