सोलापूर : काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांना पक्षाने आणखी एक मोठी संधी दिली आहे. त्यांची पश्चिम महाराष्ट्र विभागातून प्रदेश प्रतिनिधी मंडळात निवड करण्यात आली आहे. 

या निवडीला अतिशय महत्व असून काँग्रेस पक्षाच्या या नूतन प्रतिनिधींची मुदत ही पाच वर्षे असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष यांना मतदान करता येणार आहे. प्रदेशच्या कोणत्याही मिटींगला हजर राहता येणार आहे. 

चाकोते कुटुंब काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहे. स्वर्गीय बाबुराव चाकोते पासून त्यांचे चिरंजीव महादेव चाकोते, विश्वनाथ चाकोते, सिद्धाराम चाकोते यांच्या नंतर सुदीप चाकोते ही तिसरी पिढी काँग्रेस सोबत आहे. सुदीप चाकोते यांना सर्व प्रथम सेवादल यंग ब्रिगेडच्या पश्चिम महाराष्ट्र पदावर काम करण्याची संधी मिळाली. 

त्यांचे काम पाहून त्यांना लगेच सेवादल यंग ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संधी मिळाली आहे. आता पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला असून त्यांना पश्चिम महाराष्ट्र विभागातून प्रदेश प्रतिनिधी मंडळात निवड झाली असून या मंडळात जाणारे ते सोलापूर जिल्ह्यातून एकमेव नेते आहेत.