*जवाहर प्राथमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा*
आज जवाहर प्राथमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर मते सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक श्री.किशनराव वटाणे साहेब, पालक प्रतिनिधी अभिजीतराव देशमुख हे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनातील थोर सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यानंतर संचालक श्री.किशनराव वटाणे साहेब व मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते सर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा प्रमुख सोहळा पार पडला.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषणे व गीत गायन केले.यामध्ये संघर्षा सांगळे, सोनाक्षी भालेराव, योगीराज गायके, यश जुमडे, दुर्गा आव्हाड ,आराध्या रोकडे, पल्लवी घुगे, हर्षदा मोगल,शिवांशी जाधव ,श्रावणी चोपडे ,प्रज्वल देवकर, वैभव डासाळकर,श्रद्धा लिपने, श्रुती घुगे ,आर्यन पुरणे, दिव्या नागरे, भावना मुधवर, स्वानंद तम्मेवार, प्रणिती मसुरे ,भाग्यश्री तरटे, देवाशिष नागरे,विद्या भुतेकर ,धनश्री गायकवाड, उन्नती कवडे, राजवीर जगताप, सुरज लिपणे, स्वराज आदमाने यांनी भाषणे केली.
यानंतर अध्यक्षीय समारोपात बोलताना मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते सर यांनी मराठावाडा मुक्ती संग्राम दिनाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अलका परणे यांनी केले तर आभार विष्णू रोकडे यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेतील सहशिक्षक शिवाजी ठोंबरे, रामकिशन टाके, अमोल राऊत, ज्ञानेश्वर पोटे, पल्लवी तरटे, प्रियंका कापसे,अनुजा कामारिकर हे उपस्थित होते.