आष्टी येथे सृष्टी सेवाभावी संस्थेच्यावतीने पन्नास महिलांना माई पुरस्काराने केले सन्मानीत
आष्टी (प्रतिनिधी)भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांकडे, त्यांच्या अधिकारांकडे,व्यक्तिस्वातंत्र्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र अजूनही संकुचितच आहे.तो दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.हे प्रश्न मांडणारे,त्यावर उपाय सुचविणारे,उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी लक्ष देणारे महिलांप्रमाणेच पुरुषही आहेतच,हे वास्तव असूनही ही वैचारिकता समाजातील काहीच पुरुषांमध्ये असल्याचे आढळते.अधिकार गाजवणारी पुरुषी मानसिकता बदलायची असल्यास महिला सक्षमीकरणाची चळवळ ही तळागाळापर्यंत पोहोचलीच पाहिजे.असे प्रतिपादन महानंदा दूध संघाच्या संचालिका प्राजक्ता सुरेश धस यांनी केले.
आष्टी येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात सृष्टी सेवाभावी संस्था,आंबाजोगाई यांच्यावतीने विविध क्षेञात कार्यरत असलेल्या महिलांना राज्यस्तरीय माई पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात शनिवार दि.17 रोजी आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून धस बोलत होत्या.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तेजस्वीनी महिला विकास सामाजिक संस्था सातारा अध्यक्ष संगिता शिंदे ह्या होत्या.तर व्यासपीठावर आष्टी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा पल्लवी धोंडे,बीड जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष सविता गोल्हार यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.