जिंतूर तालुक्यातील प्रतिष्ठीत व मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये गणल्या जाणाऱ्यापैकी कौसडी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. कौसडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी 18 सप्टेंबर रोजी कौसडीत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली व मतदानाची मतमोजणी प्रक्रिया जिंतूर तहसील कार्यालयात 19 सप्टेंबर रोजी पार पडली. या मध्ये जनतेतून थेट सरपंच पदासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश नागरे व काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष पुरस्कृत पॅनलचे मोबीन कुरेशी हे विजयी झाले आहेत.
एकूण 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये 7 ग्रामपंचायत सदस्य निर्वाचित झाले.
सरपंच मोबीन कुरेशी यांच्या सह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार नागरे यांच्या कार्यालयात करण्यात आला. या प्रसंगी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, राजेंद्र नागरे, बासू पठाण, रामजी घुगे, नागसेन भेरजे, कृष्णा राउत, फिरोज कुरेशी, रेहमान भाई, मुखीद भाई, रावसाहेब खंदारे, अर्जुन वजीर, तहसिन देशमुख, प्रभाकर कुर्हे, कृष्णा टाकरस, जाबेर मुल्ला, मुजहेद कादरी, प्रभाकर ईखे, पाशा पठाण, अनिल शेंद्रे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थीत होते.