जिंतूर: चारठाना येथून जवळच असलेल्या सोनापुर तांडा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून दि.१८ रविवार रोजी ऊसतोड कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे ऊद्घाटक परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते तर अध्यक्षास्थानी जिंतूर सेलु आमदार मेघना साकोरे( (बोर्डीकर) ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे परभणी मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, भाजप नेते लक्ष्मण बुधवंत, संतोष राठोड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. हंगामी वसतीगृहात बाबतचा अहवाल व विद्यार्थ लवकरात लवकर समोर आणुन द्यावी ,दरवर्षीच साखर कारखान्याच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मजूर ऊसतोड तोडणीसाठी जातात ,तसेच कामाच्या शोधात दिवाळीनंतर बांधकाम कामगार, वीटभट्टी अनेक मजूर कामासाठी गाव खेडे पाडे या ठीकाणीवरुन मजुर स्थलांतर करतात अशा स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होऊ नयेत व शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत म्हणून समग्र शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृहाची योजना राबवली जाते असे या मेळाव्यातील कार्यक्रमा प्रसंगी शिवानंद टाकसाळे यांनी सागितले आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पाठपुराव्याला यश
ऊसतोड कामगाराच्या पाल्याची व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नयेत म्हणून दरवर्षीच समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात अनिवासी हंगामी वसतीगृह सुरु करण्यात येते,यावर्षी ते प्रस्तावित आहे लवकरात लवकर ऊसतोड तोडणी कामगाराच्या विद्यार्थ्यांसाठी हंगामी वसतीगृहसुरु करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आशा वर्कर ,ग्रामविकास अधिकारी,तलाठी,शिक्षक, केंद्रप्रमुखाना दिले आहेत. यामुळे आमदार मेघना बोर्डीकर याच्या पाठपुरावायास यश मिळाल्याने ऊस तोड कामगार आनंद व्यक्त करीत आहेत.
आपले सेवा केंद्राच्या वतीने विविध योजनांचे कम्प
आपले सरकार सेवा केंद्र जिंतूर यांच्या वतीने कॅम्प लावण्यात आला होता यामध्ये प्रधानमंत्री किसान मानधन योजना, केवायसी, प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड, यामध्ये कुटुंबाला वार्षिक पाच लाखाचा विमा कवच तसेच ई-श्रम कार्ड, सामाजिक सुरक्षा योजना, असे विविध योजनेअंतर्गत कॅम्प चे आयोजन सोनापुर तांडा येथे करण्यात आले. हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी जिंतूर तालुका व्यवस्थापक अनिल ठोंबरे, सेलू तालुका व्यवस्थापक ज्ञानेश्वर आघाव, आपले सरकार सेवा केंद्र चालक आशिष धुत, प्रसाद जोशी, पवन घाटुळ, अल्केश हिरप,नितीनआप्पा घळे, गजानन हुलगुंडे, विठ्ठल सानप यांनी परिश्रम घेतले.