अमरावती जिल्हातील चिखलदरा तालुक्यांतील हतरु गावातील आदिवासी बांधव मुंगीया बाजीलाल ठाकोर , भाऊलाल मोतीराम ठाकोर ,बाबुलाल भुऱ्या धांडे व धाजू दादू बेठेकर 26 ऑगस्ट रोजी गावातील नदीवर मासोळी व खेकडे पकडायला जात असता वनविभागातील अधिकारी शेलार यांनी तसेच त्यांचे अधिनस्त कर्मचारी माहूरकर यांनी कोरकु ने ईधर आनेका नहीं अशी धमकी देवून मारहाण केली तथा त्यांच्या मोटर सायकली रोखून ठेवल्या याबाबत बाबुलाल धांडे यांनी विचारणा केली असता त्याला उठक बैठका काढायला लावल्या व जातीवाचक शिव्या दिल्या.  

या घटनेबाबत आदिवासीचे शिष्टमंडळ अँड. सिद्धार्थ गायकवाड यांचे नेत्रूत्वात अमरावती पोलीस अधिक्षक यांना भेटून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच गुन्हा दाखल न केल्यास आरोपीला अभय देणाऱ्या ठाणेदाराला सुद्धा आरोपी करण्यात येईल व पोलीस अधीक्षक कार्यालया समोर बेमुदत धरणे देण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले .संबंधित घटनेची तक्रार धाजू दादू बेठेकर यांनी दुसऱ्या दिवशी चिखलदरा पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी अट्रासीटी कायद्यातील तरतुदींची पायमल्ली करीत थातूर मातूर वनाधिकाऱ्या विरुद्ध भा.द.वी. 323,506,504 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवून आरोपींना अभय दिले.

      त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा ईशारा देण्यात आला. निवेदन देतांना पब्लिक पार्लमेंटचे सय्यद फुझैल विनोद बेलकर, चंपालाल शेळेकर, मोंग्या बेडेकर, मुन्ना बेठेकर कालु बेठेकर राजाराम बेडेकर,दिनेश स्वामी, मीनाताई नागदिवे वहिदा नायक , शेवंती पटोरकर भागीरथी भिलावेकर शिवा प्रधान ऍड.संघपाल अढाव, ऍड.विकास गवई,,ऍड.रमेश तंतरपाळे ,ऍड.प्रेम दामोदर, ऍड.रवी वरठी,ऍड. निलेश गजभिये,ऍड. प्रकाश प्रधान, ऍड.शुभम कांबळे, ऍड.सुधीर तायडे,ऍड.शिवशंकर आमझरे,ऍड. अमोल लोणारे, दिनेश मेश्राम रुपेश गवई ऍड. रवि गायकवाड ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.